शहर परिसरातून धम्म रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:44 IST2019-05-19T00:43:50+5:302019-05-19T00:44:09+5:30
बुद्ध पौर्णिमानिमित्त बुद्धविहार समन्वय समिती आणि धम्म संस्कार प्रचार-प्रसार व प्रबोधन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने धम्म रॅली काढण्यात आली.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त अशोका मार्ग येथून धम्म रॅलीस प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी मान्यवर.
नाशिक : बुद्ध पौर्णिमानिमित्त बुद्धविहार समन्वय समिती आणि धम्म संस्कार प्रचार-प्रसार व प्रबोधन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने धम्म रॅली काढण्यात आली.
या रॅलीत शहरातील विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला. रॅलीचा प्रारंभ अशोका मार्गावरील कल्पतरुनगरातील धम्मकिरण बुद्धविहार येथे पोलीस उपआयुक्त अमोल तांबे यांच्या हस्ते ध्वज दाखवून करण्यात आला. या प्रसंगी लेखक उत्तमराव कांबळे, रोटरीचे चेअरमन अवतारसिंग, सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक नसीर तडवी, फादर आॅल्विन, सामाजिक कार्यकर्ते सलीम बटाडा, अनिल सुकेनकर, दिलिप बेनिवाल, डॉ. मनीषा जगताप आदि उपस्थित होते.
या रॅलीत घोड्याच्या बग्गीमध्ये भगवान गौतम बुद्धांची मूर्ती ठेवण्यात आली होती. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील दोन जिवंत देखावेही सहभागी झाले होते. चित्ररथांच्या मागे सन्डे धम्म स्कूलचे विद्यार्थी तसेच महिला व पुरुष यांनी सहभाग घेतला. रॅलीचा समारोप नाशिकरोड येथील महाकर्म भूमी बुद्धविहार येथे करण्यात आला.