सुषमा अंधारे यांच्यावर विशेषाधिकारात हक्कभंग आणणार - देवयानी फरांदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 18:55 IST2023-12-16T18:46:35+5:302023-12-16T18:55:26+5:30

हिवाळी अधिवेशनातील कामकाजाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

Devyani Farande will bring violation of privilege against Sushma Andhare | सुषमा अंधारे यांच्यावर विशेषाधिकारात हक्कभंग आणणार - देवयानी फरांदे

सुषमा अंधारे यांच्यावर विशेषाधिकारात हक्कभंग आणणार - देवयानी फरांदे

- संकेत शुक्ल

नाशिक : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांना आलेल्या एका निनावी पत्राचा आधार घेत एमडी ड्रग्ज प्रकरणात आपल्यावर आरोप केला. त्यामुळे माझी बदनामी झाली असून सोमवारी हिवाळी अधिवेशनात मी त्याविरोधात विशेषाधिकारात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी दिली.

हिवाळी अधिवेशनातील कामकाजाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील अनेक प्रकरण विधानसभेसह अधिवेशनात गाजत आहेत. एमडी ड्रग्जसह सलीम कुत्ता यांनी राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत आ. देवयानी फरांदे यांचा एमडी ड्रग्ज प्रकरणात सहभागाबद्दल एका पत्राद्वारे केलेला आरोप तसेच सलीम कुत्ता प्रकरणात व्हायरल झालेल्या पार्टीत आपला सहभाग असल्याचा केलेला आरोप माझी बदनामी करणारा आहे. त्यामुळे सोमवारी मी अधिवेशन काळात विशेषाधिकाराचा वापर करून त्यांच्याविरोधात हक्कभंग आणणार असल्याची माहिती आ. फरांदे यांनी दिली.

Web Title: Devyani Farande will bring violation of privilege against Sushma Andhare