देवपूर येथे बिबट्याने वासराला केले फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 16:24 IST2020-08-29T16:11:41+5:302020-08-29T16:24:49+5:30
देवपूर: सिन्नर तालुक्यातील देवपूर येथे वासराला बिबट्याने फस्त केल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.

देवपूर येथे बिबट्याने वासराला केले फस्त
देवपूर: सिन्नर तालुक्यातील देवपूर येथे वासराला बिबट्याने फस्त केल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. येथील शेतकरी मोतीराम मुकुंदराव गडाख यांचे गावालगत घर असून घराजवळच जनावरे बांधलेली होती. नुकतेच जन्म झालेले एक दिवसाचे वासरू गायी जवळ बांधलेले होते. सकाळी वासराचा जन्म झाला व त्याच रात्री बिबट्याने वासरू फस्त केले. रात्री मोतीराम गडाख बाहेर झोपलेले असताना हा प्रकार घडला. सुरुवातीस वासरू गायी जवळ नसल्याने गडाख गोंधळले . परंतु नंतर बिबट्याने वासरू खाल्याचा संशय आल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. वासरास पूर्ण फस्त केलेले असल्याने बिबट्याचं असल्याचा निर्वाळा अधिकाऱ्यांनी दिला . परिसरात मका शेतीमुळे बिबट्या या परिसरात आश्रयास असण्याची शक्यता आहे . रात्रीच्या वेळी बाहेर पडताना नागरिकांमध्ये घबराट पसरली असून सावधगिरी बाळगत आहे . या परिसरात वनविभागाने पिंजरा लावून गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.