तणनाशक फवारल्याने पिके जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 10:12 PM2020-07-01T22:12:31+5:302020-07-01T23:08:52+5:30

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील शेतकऱ्याच्या घेवडा व गिलके पिकावर अज्ञात व्यक्तीने तणनाशक औषध फवरल्याने पिके जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जानोरी येथील आडगाव रस्त्याला शेती असणारे प्रभाकर सोनवणे यांनी नाशिक येथून महागाचे घेवडा व गिलक्याचे बियाणे आणून शेतात बी लागवड केली होती.

Destroy crops by spraying herbicides | तणनाशक फवारल्याने पिके जळून खाक

तणनाशक फवारल्याने पिके जळून खाक

googlenewsNext
ठळक मुद्देअज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळेत पिकावर तणनाशक फवारणी

लोकमत न्यूज नेटवर्क
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील शेतकऱ्याच्या घेवडा व गिलके पिकावर अज्ञात व्यक्तीने तणनाशक औषध फवरल्याने पिके जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जानोरी येथील आडगाव रस्त्याला शेती असणारे प्रभाकर सोनवणे यांनी नाशिक येथून महागाचे घेवडा व गिलक्याचे बियाणे आणून शेतात बी लागवड केली होती. त्यानंतर दहा ते पंधरा दिवसात त्याचे मोठे रोपे तयार झाले होते. परंतु अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळेत एक बिघा घेवडा व एक बिघा गिलके पिकावर तणनाशक फवारणी केल्याने सोनवणे यांचे नुकसान झाले आहे. त्यांना आता दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.

Web Title: Destroy crops by spraying herbicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.