शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
4
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
5
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
6
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
7
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
8
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
9
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
10
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
11
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
12
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
13
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
14
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
15
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
16
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
17
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
18
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
19
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
20
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणामुळे इच्छुकांचा हिरमोड

By admin | Updated: January 10, 2017 00:35 IST

वीरगाव गटात रस्सीखेच : सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपा महिला उमेदवाराच्या शोधात

 नितीन बोरसे सटाणा
बागलाण तालुक्यातील वीरगाव गटावर निर्मितीपासूनच कॉँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. या गटात पक्षापेक्षा व्यक्तीभोवतीच राजकारण फिरत असल्याचे अनुभवायला आले आहे. या गटात समाविष्ट गावे दहा वर्षांपूर्वी कळवण मतदारसंघातील असल्यामुळे साहजिकच या गटावर माजी मंत्री ए. टी. पवार यांचे प्राबल्य आहे. यंदा हा गट अनुसूचित जमाती महिला राखीव झाल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला असून, कॉँग्रेसच्या ताब्यातील हा गड पुन्हा ताब्यात घेण्यासाठी या राजकीय दंगलीत विजयश्री खेचून आणणाऱ्या सक्षम महिला उमेदवाराच्या शोधात भाजपा दिसून येत आहे.
वीरगाव गटाची दहा वर्षांपूर्वी गट पुनर्रचनेत निर्मिती झाली. यापूर्वी हा गट डांगसौंदाणे गटात समाविष्ट होता. माजी मंत्री कै. डॉ. दौलतराव अहेर व माजी मंत्री ए. टी. पवार हे दोन्ही प्रभावी नेते तत्कालीन युती सरकारच्या मंत्रिमंडळात होते. त्याच काळात मविप्र आणि वसाका या मोठ्या संस्थादेखील कै. डॉ. अहेर यांच्या ताब्यात होत्या. वसाकाच्या माध्यमातून ऊस परिषद असो वा निवडणूक असो, या भागात दांडगा संपर्क असल्यामुळे साहजिकच डॉ. अहेर यांचा या भागावर मोठा प्रभाव होता. डॉ. अहेर यांच्या वर्चस्वामुळे कुमोदिनी महाले, नारायण साबळे यांच्या माध्यमातून भाजपाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. गट पुनर्रचनेत वीरगाव गटाची नव्याने निर्मिती होऊन हा गट सर्वसाधारण महिला आरक्षित करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती यशवंत पाटील यांच्या पत्नी काँग्रेसच्या संगीता पाटील व प्रा. अनिल पाटील यांच्या मातोश्री व राष्ट्रवादीच्या उमेदवार मीराबाई पाटील यांच्यात चुरशीची लढत रंगली होती. संगीता पाटील विजयी झाल्याने मीराबाई पाटील यांना होमग्राउण्डवर पराभव पत्करावा लागला होता. युतीच्या उमेदवाराला मात्र तिसऱ्या क्र मांकावर समाधान मानावे लागले होते. गेल्या निवडणुकीत आरक्षण सोडतीत हा गट ओबीसी प्रवर्गातील पुरुष राखीव झाला. त्यामुळे साहजिकच इच्छुकांची संख्यादेखील वाढली. प्रा. अनिल पाटील यांच्या मातोश्री थोड्या फरकाने पराभूत झाल्यामुळे पाटील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय धर्मराज खैरनार यांना पक्षाने तिकीट दिल्यामुळे ऐनवेळी प्रा. पाटील यांना पक्षांतर करून काँग्रेसच्या तिकिटावर मैदानात उतरावे लागले.