शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पदच्युत पदाधिकाऱ्यांना रहावे लागणार निवडणुकीपासून वंचित

By admin | Updated: April 2, 2017 02:00 IST

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या (सावाना) तत्कालीन अध्यक्षांनी पदच्युत केलेल्या पदाधिकाऱ्यांचा निवडणूक प्रक्रियेत सामील होण्याचा मार्ग अखेर बंद झाला.

 नाशिक : संस्थेच्या घटनेच्या विविध कलमांचे उल्लंघन करीत कामकाज केल्याप्रकरणी सार्वजनिक वाचनालयाच्या (सावाना) तत्कालीन अध्यक्षांनी पदच्युत केलेल्या पदाधिकाऱ्यांचा निवडणूक प्रक्रियेत सामील होण्याचा मार्ग अखेर शनिवारी (दि.१) बंद झाला. ‘त्या’ तिघा पदाधिकाऱ्यांनी दिवाणी न्यायालयात अर्जाद्वारे अध्यक्षांच्या कारवाईला आव्हान दिले होते; मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फे टाळून लावला.संस्थेच्या घटनात्मक कलमांचे उल्लंघन करत कामकाज केल्याप्रकरणी मिलिंद जहागिरदार, प्रा. विनया केळकर आणि स्वानंद बेदरकर या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करत सभासदत्व रद्द केले होते. अध्यक्षांना याप्रकारे पदच्युत करण्याचा अधिकार नसल्याने त्यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. या दाव्यावर अद्याप अंतिम सुनावणी झाली नसून न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत पदावर सामावून घ्यावे, तसेच निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे यासाठी या पदच्युत पदाधिकाऱ्यांनी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायाधीश सूरज केंद्रे यांनी पदाधिकाऱ्यांचा अर्ज फेटाळला. या दाव्याच्या सुनावणीच्या वेळी सावानाकडून बाजू मांडणारे अ‍ॅड. ए. आर. देशपांडे, अ‍ॅड. अतुल गर्गे यांनी दिवाणी न्यायसंहितेनुसार अर्ज करून सदर दावा चालविण्याचा अधिकार दिवाणी न्यायालयास नाही, अशी भूमिका घेतली आहे. जहागिरदार यांचे वकिलांनी या दाव्यावर न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत अध्यक्षांच्या पदच्युत करण्याच्या कारवाईला स्थगिती द्यावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली होती. या अर्जावर दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद झाले. या अर्जावर ११ तारखेला सुनावणी होणार आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये या पदच्युत पदाधिकाऱ्यांना सहभागी होता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)