Deputy Director of Education in a mess! | शिक्षण उपसंचालकपदाचा घोळात घोळ!

शिक्षण उपसंचालकपदाचा घोळात घोळ!

ठळक मुद्देसक्षम अधिकारी नियुक्त करण्याची गरजचार महिन्यांत तीन अधिकारी

नाशिक : शहरासह जिल्ह्यात शैक्षणिक वर्र्ष सुरू होत असताना शिक्षण उपसंचालकपदाचा मात्र घोळात घोळ सुरू असून, तीन ते चार महिन्यांत तीन अधिकारी बदलण्यात आले आहेत. तथापि, या पदावर गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षण खात्याला पूर्णवेळ आणि स्थायी स्वरूपात अधिकारी मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
शिक्षण विभागाच्या दृष्टीने उपसंचालकपद असले तरी मुळात अशा प्रकारच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ऐन कोरोनाच्या संकटातदेखील या पदाचा अतिरिक्त कार्यभार बोर्डाचे सचिव नितीन उपासनी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला होता. मात्र, आठच दिवसात त्यांची तडकाफडकी बदली करण्यात येऊन पुष्पा पाटील यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोवण्यात आला होतो. दरम्यान त्यांचीही बदली करून आता प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांच्याकडे कार्यभार देण्यात आला आहे. परंतु तोही वादग्रस्त ठरला असून, काही संघटनांनी त्यांच्या एकूणच कारभाराचा पूर्वेइतिहास मांडत बदलीची मागणी केली आहे.
शिक्षण उपसंचालकपद महत्त्वाचे असले तरी ते वादग्रस्त ठरले आहे. त्यात राजकीय वशिल्यानेच या ठिकाणी नियुक्त्या होतात असे अनेकदा दिसून येते. त्यासाठी कोणताही स्वतंत्र निकष नसल्याने एकापेक्षा एक अधिकारी नियुक्त होतात आणि त्याच्या नियुक्तीपासूनच वाद सुरू होतात. त्यामुळे शासनाला ज्याचा पूर्वेतिहास वादाचा नाही अशी पार्श्वभूमी असलेला अधिकारी मिळणे दुर्मीळ झाले आहे की काय, असादेखील प्रश्न निर्माण झाला आहे.

 

Web Title: Deputy Director of Education in a mess!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.