शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

छापील वीज बिल भरणा पावती होणार हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 1:26 AM

: ग्राहकांच्या सुविधेबरोबरच काटकसरीच्या धोरणाचा भाग म्हणून आता ग्राहकांना वीज बिल भरणा केल्याची छापील पावती न मिळता संगणकीय प्रिंटआउट मिळणार आहे. यामुळे महावितरणची छापील पावती हद्दपार होणार आहे. नवीन मिळणाऱ्या पावतीवरील क्रमांकाच्या आधारे बिलभरणा झाल्याची खात्रीदेखील करून घेता येणार आहे.

नाशिक : ग्राहकांच्या सुविधेबरोबरच काटकसरीच्या धोरणाचा भाग म्हणून आता ग्राहकांना वीजबिल भरणा केल्याची छापील पावती न मिळता संगणकीय प्रिंटआउट मिळणार आहे. यामुळे महावितरणची छापील पावती हद्दपार होणार आहे. नवीन मिळणाऱ्या पावतीवरील क्रमांकाच्या आधारे बिलभरणा झाल्याची खात्रीदेखील करून घेता येणार आहे.नाशिक परिमंडळातील नाशिक शहर १ व १ आणि मालेगाव या विभागासह हा उपक्र म राज्यातील २५ शहरी विभागांमध्ये सोमवार, दि. १६ पासून अंमलात येणार असून, याचा शुभारंभ नाशिकरोड येथील विद्युत भवनच्या आवारात असलेल्या दत्ताजी देशमुख पतसंस्थेच्या वीज बिल भरणा केंद्रावर करण्यात आला. यावेळी मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांच्या हस्ते ग्राहकाला नवीन स्वरूपातील पावती देऊन औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्य औद्योगिकसंबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, वरिष्ठ व्यवस्थापक दिनकर मंडलिक, सहायक विधी अधिकारी प्रशांत लहाने, व्यवस्थापक मंगेश गाडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र महाजन आदी उपस्थित होते.वीज बिल भरणा करणाºया ग्राहकांना आता संगणकीकृत क्र मांक असणाºया पावत्या कोºया कागदावर छापून देण्यात येणार आहेत. ग्राहकांना हा संगणकीकृत क्र मांक वापरून महावितरणचे संकेतस्थळ किंवा मोबाइल अ‍ॅपवर वीज बिल भरल्याची खात्री करता येईल. सोबतच वीज बिल भरणा केल्यानंतर ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाइलवर याचा संदेश सुद्धा प्राप्त होणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी भरणा पावतीवर संगणकीकृत क्र मांक असल्याची खातरजमा करणे अपेक्षित आहे.दरम्यान, छापील स्वरूपातील पावत्या बाद करण्यात आल्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी हस्तलिखित पावत्या नाकाराव्यात व यासंदर्भात नजीकच्या महावितरण कार्यालयाला माहिती द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.महावितरणाचा वाचणार खर्चमहावितरणने शहरात अनेक ठिकाणी वीज बिल भरणा केंद्रांना मान्यता दिली असून, त्यामध्ये खासगी बॅँकाचाही समावेश आहे. महावितरणच्या जागेतदेखील काही खासगी संस्थांची वीज बिल भरणा केंद्रे सुरू आहेत.या केंद्रामधून ग्राहकांना महावितरणचा लोगो, कंपनीचे नाव आणि संदर्भित माहिती असलेली छापील स्वरूपातील भरणा बिल दिले जात होते. आता अशी छापील बिले बंद होणार असून, साध्या कागदावर संगणकीकरण पावती ग्राहकांच्या हाती पडणार आहे. यामुळे बिल छपाईवर होणारा महावितरणचा खर्च वाचणार आहे.

टॅग्स :electricityवीजbillबिल