बेलगाव कुऱ्हे ते शिर्डी पालखी पदयात्रेचे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 18:14 IST2021-02-06T18:13:38+5:302021-02-06T18:14:35+5:30

नांदूर वैद्य : बेलगाव कुऱ्हे येथील साई सेवा मित्रमंडळाच्या सातव्या बेलगाव कुऱ्हे ते शिर्डी साईबाबा पालखी पदयात्रेस प्रारंभ झाला. साई पालखीचे घरोघरी पूजन करण्यात आले. त्यानंतर मारूती मंदिरापासून साई पालखी मिरवणुकीला ढोल ताशाच्या गजरात सुरुवात करण्यात आली.

Departure of Belgaum Kurhe to Shirdi Palkhi Padayatra | बेलगाव कुऱ्हे ते शिर्डी पालखी पदयात्रेचे प्रस्थान

बेलगाव कुऱ्हे ते शिर्डी पालखी पदयात्रेचे प्रस्थान

ठळक मुद्देअसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित

नांदूर वैद्य : बेलगाव कुऱ्हे येथील साई सेवा मित्रमंडळाच्या सातव्या बेलगाव कुऱ्हे ते शिर्डी साईबाबा पालखी पदयात्रेस प्रारंभ झाला. साई पालखीचे घरोघरी पूजन करण्यात आले. त्यानंतर मारूती मंदिरापासून साई पालखी मिरवणुकीला ढोल ताशाच्या गजरात सुरुवात करण्यात आली.

या मिरवणुकीमध्ये सुंदर असे नृत्य सादर करणाऱ्या आश्वांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते. यावर्षी या पदयात्रेत जवळपास ३० ते ४० महिलांनी आपला सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद देत साई पालखी पदयात्रेचा आनंद घेतला. यानंतर साई पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना निरोप देण्यासाठी परिसरातून तसेच गावातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानंतर ओम साईराम, साईबाबा की जय च्या गजरात पालखीचे पुढील मार्गाकडे प्रस्थान करण्यात आले. पालखी ७ फेब्रुवारीला सायंकाळी शिर्डीमध्ये पोहोचणार आहे.

पालखी सोहळ्यामध्ये नवनाथ मांडे, गणेश गुळवे, संपत बोराडे, प्रमोद गाडेकर, संदीप गुळवे, पंडित गुळवे, संदीप ठाणगे, किरण गुळवे, संदीप गुळवे, सुनील गुळवे, समाधान गुळवे, ज्ञानेश्वर गुळवे, तसेच सर्व साई समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ हे विशेष मेहनत घेत आहेत. -

बेलगाव कुऱ्हे येथून शिर्डीकडे निघालेल्या साईपालखी पदयात्रेत सहभागी झालेले भाविक. (०६ नांदूरवैद्य १)

Web Title: Departure of Belgaum Kurhe to Shirdi Palkhi Padayatra