डेंग्यूचा कहर : नऊ महिन्यांच्या बालकाचा नाशकात डेंग्यूने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 15:01 IST2018-10-27T14:59:32+5:302018-10-27T15:01:53+5:30

जुने नाशिकमधील कथडा परिसरात या आजारांनी नागरिक त्रस्त झाले असून याच भागात राहणारे रिक्षाचालक नवाज शेख यांचा एकुलता एक मुलगा अशरफ हा अवघ्या नऊ महिन्यांचा झाला होता. त्याला डेंग्यूच्या डासाने दंश केल्याने त्याची प्रकृती खालावली.

Dengue havoc: dengue death due to nine months pregnancy | डेंग्यूचा कहर : नऊ महिन्यांच्या बालकाचा नाशकात डेंग्यूने मृत्यू

डेंग्यूचा कहर : नऊ महिन्यांच्या बालकाचा नाशकात डेंग्यूने मृत्यू

ठळक मुद्देडासांची उत्त्पत्तीठिकाणे तत्काळ शोधून नष्ट करण्यावर भर देण्याची गरज बालकाचा डेंग्यूशी लढा अपयशी ठरला.प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेऊन निद्रीस्त

नाशिक : शहरातील गावठाण परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने नाशिक मधील कथडा भागात एका कु टुंबातील नऊ महिन्यांच्या बालकाचा डेंग्यूसदृश्य आजाराने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहर व परिसरात डेंग्यू, चिकुणगुण्या यांसारख्या आजारांचा फैलाव ‘एडीस’ जातीच्या डासांपासून होत असून दुसरीकडे विषाणूजन्य आजारांनीही डोके वर काढल्याने नागरिक हैराण झाले आहे; मात्र महापालिकेच्या आरोग्य विभाग अद्यपही सुस्त असून विषाणूजन्य अजारांसह डेंग्यू, चिकुणगुण्यासारख्या आजारांचा प्रादूर्भाव रोखण्यास आरोग्य विभाग, शहरी आरोग्य विभाग व हिवताप नियंत्रण विभाग पुर्णत: अपयशी ठरले आहे. सध्या महापालिके मधील प्रशासकिय कारभारासह लोकप्रतिनिधींचा कारभारही थंडावला आहे. लोकप्रतिनिधींचे अधिकाºयांवर वचक न राहिल्याने प्रशासनाकडून शहरात मुलभूत सोयीसुविधांची कामे करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. डेंग्यू, चिकुणगुण्या यासारख्या आजाराने थैमान घातले असतानाही प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेऊन निद्रीस्त झाल्याचे दिसून येत आहे.
जुने नाशिकमधील कथडा परिसरात या आजारांनी नागरिक त्रस्त झाले असून याच भागात राहणारे रिक्षाचालक नवाज शेख यांचा एकुलता एक मुलगा अशरफ हा अवघ्या नऊ महिन्यांचा झाला होता. त्याला डेंग्यूच्या डासाने दंश केल्याने त्याची प्रकृती खालावली. रोगप्रतिकारक शक्तीचा अधिक विकास कमी वयामुळे न झाल्याने बालकाचा डेंग्यूशी लढा अपयशी ठरला. शुक्रवारी उपचारादरम्यान चिमुकल्याची प्राणज्योत मालवली. कथडा भागातील सुमारे दहा ते पंधरा कुटुंबांमध्ये डेंग्यूसदृश्य आजाराची लागण झालेले रुग्ण औषधोपचार घेत आहेत. या भागात डेंग्यूच्या डासांची उत्त्पत्तीठिकाणे तत्काळ शोधून डासांच्या अळ्या, अंडी, कोष नष्ट करण्यावर भर देण्याची गरज आहे. कथडा परिसरापासून महापालिकेचे डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय अगदी जवळ जरी असले तरी या रुग्णालयात दर्जेदार गुणवत्तापुर्ण औषधोपचार रुग्णाला मिळेलच याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे नागरिक शक्यतो या रुग्णालयात जाणे टाळतात.
---

Web Title: Dengue havoc: dengue death due to nine months pregnancy