मागासवर्गीय विद्युत कर्मचाऱ्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 01:21 AM2019-12-18T01:21:14+5:302019-12-18T01:22:02+5:30

महावितरणच्या नाशिक विभागात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर वाढलेले अन्याय-अत्याचार, बदलीमध्ये भेदभाव, मालेगाव विभागाचे खासगीकरण व इतर धोरणात्मक प्रश्नासंदर्भात महाराष्टÑ राज्य मागासवर्गीय विद्यृत कर्मचारी संघटनेच्या वतीने विद्युत भवनवर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.

Demonstrations of backward class staff | मागासवर्गीय विद्युत कर्मचाऱ्यांची निदर्शने

नाशिकरोड येथील विद्युतभवनसमोर निदर्शने करताना कर्मचारी.

Next
ठळक मुद्देमोर्चाद्वारे निषेध : अन्याय होत असल्याचा आरोप

नाशिकरोड : महावितरणच्या नाशिक विभागात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर वाढलेले अन्याय-अत्याचार, बदलीमध्ये भेदभाव, मालेगाव विभागाचे खासगीकरण व इतर धोरणात्मक प्रश्नासंदर्भात महाराष्टÑ राज्य मागासवर्गीय विद्यृत कर्मचारी संघटनेच्या वतीने विद्युत भवनवर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.
मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध प्रश्न व समस्यासंदर्भात मंगळवारी घोषणा देत विद्युत भवन प्रवेशद्वारावर मोर्चा काढत निदर्शने करण्यात आली. यावेळी मुख्य अभियंत्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आंदोलनामध्ये माजी केंद्रीय अध्यक्ष अरुण भालेराव, केंद्रीय उपाध्यक्ष परेश पवार, जे. वाय. पांढरे, आनंद गांगुर्डे, अभिजित आहिरे, पृथ्वीराज सोनवणे, अनिल तिजोरे,
के. बी. जाधव, संजय खंडिझोड, प्रकाश जाधव, वी. जी. पगारे, अनिल रोकडे, संदीप शिंदे आदी उपस्थित होते.
अशा आहेत मागण्या
मागासवर्गीयांचा सरळसेवा व पदोन्नतीमधील अनुशेष भरण्यात यावा, महावितरणच्या बदली धोरणाची व्यवस्थित अंमलबजावणी करावी, झोनमधील वर्ग तीन व चार पदोन्नतीचे पॅनल पात्र कर्मचाºयांना पदोन्नती द्यावी, वीज बिल संबंधित एजन्सीवर कारवाई करावी, सर्व स्तरावरील शिस्तभंग कारवाईची प्रकरणे निर्णयांकित करा, जी.ओ. ३४/१११ ची प्रकरणे मंजूर करावी, सुरक्षा साधने उपलब्ध करावी, रिक्त जागा भरा, लाइन स्टाफवरील कामाचा बोजा कमी करा, सबस्टेशनमधील असुविधा दूर कराव्यात, वीज कर्मचाºयांवर तसेच लाइनस्टाफवर अधिकाºयांचा वाढता हस्तक्षेप थांबविण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Web Title: Demonstrations of backward class staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.