शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

पानेवाडी प्रकल्पात प्रात्यक्षिक

By admin | Updated: August 26, 2016 21:52 IST

भारत पेट्रोलियम : सुरक्षेसाठी उपकरणे, यंत्रणेची तपासणी

 मनमाड : वेळ दुपारी साडेअकरा वाजेची. पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम कंपनीत धोक्याचा सायरन वाजतो व सर्वांची एकच धावपळ उडते. प्रकल्पातील इंधन भरून झालेल्या टँकरच्या व्हॉल्व्हमधून गळती होऊन आग लागल्याची सूचना नियंत्रण कक्षाकडून देण्यात येते. अग्निशमन दल, सहायक दल व बचाव दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचतात. जवाची पर्वा न करता फोम व पाण्याच्या फवाऱ्यांनी अवघ्या १५ मिनिटात आग आटोक्यात आणण्यात यश मिळते व हिरवा झेंडा फडकवून धोका टळल्याचा संदेश देण्यात येतो. सदरची दुर्घटनेतील आग ही खरी नसून अचानक अशी घटना घडल्यास सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे याची चाचणी घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेले प्रात्यक्षिक असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मनमाडजवळील पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम प्रकल्पामध्ये चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. सुरक्षा यंत्रणा तसेच आगीवर नियंत्रण मिळवणारी उपकरणे व यंत्रसामग्रीची गुणवत्ता व परिस्थिती तपासण्यासाठी वर्षातून दोन वेळा आपत्कालीन आग प्रतिबंधक प्रात्यक्षिकांचे आयोजन इंधन कंपन्यांमध्ये केले जाते. प्रकल्प प्रबंधक देवीदास पानझाडे यांनी उपस्थित परीक्षकांचे स्वागत करून प्रकल्पाची व्याप्ती तसेच सुरक्षा साधने व उपाययोजनांची माहिती दिली़ यावेळी भारत पेट्रोलियमचे प्रकल्प व्यवस्थापक देवीदास पानझाडे, औद्योगिक उपसंचालक आर.डी. दहीफळे, जी.पी. जोशी, महिद्रा कंपनीचे हरिष चोबे, आर.के. गुप्ता, सरपंच अशोक पवार, अमित पारसे, मनोज नलावडे, अनिल मोरे, पंकज जेजुरकर आदि अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)