नाशिकला बंगला मालकाकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 17:01 IST2018-08-18T16:58:54+5:302018-08-18T17:01:35+5:30

नाशिक : बांधकाम सुरू असलेल्या बंगल्याचे काम बंद पाडून मजुरांना शिवीगाळ केली तसेच बंगलामालकाकडे जमिनीची मागणी करून ती न दिल्यास पाच लाखांच्या खंडणीची मागणी केल्याची घटना जयभवानी रोडवरील भालेराव मळ्यात घडली आहे़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

 Demand for Rs 5 lakhs ransom to the owner of the house in Nashik | नाशिकला बंगला मालकाकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी

नाशिकला बंगला मालकाकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी

ठळक मुद्देदोन संशयित ; खंडणीचा गुन्हा दाखल

नाशिक : बांधकाम सुरू असलेल्या बंगल्याचे काम बंद पाडून मजुरांना शिवीगाळ केली तसेच बंगलामालकाकडे जमिनीची मागणी करून ती न दिल्यास पाच लाखांच्या खंडणीची मागणी केल्याची घटना जयभवानी रोडवरील भालेराव मळ्यात घडली आहे़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

संजय भालेराव (रा़ सरस्वती निवास) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित सन्नी हिरालाल गाडेकर (२७) व विकी भावसार (३२, दोघे रा. मेघा किराणामागे, भालेराव मळा, जय भवानी रोड) यांनी मोबाइलवर फोन करून शिवीगाळ व दमदाटी केली़ तसेच ११ व १२ आॅगस्ट रोजी भालेराव यांच्या बंगल्याचे सुरू असलेले काम बंद पाडले़ यानंतर भालेराव यांच्याकडे जमिनीची मागणी केली व ती न दिल्यास पाच लाख रुपयांची मागणी केली़

या प्रकारानंतर भालेराव यांनी पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गाडेकर व भावसार या दोघांना अटक केली आहे़

Web Title:  Demand for Rs 5 lakhs ransom to the owner of the house in Nashik