खर्डे : रामेश्वर धरणात चणकापुर उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात यावे, तसेच दुष्काळी अनुदानाचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करण्यात यावा आदीसह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना दिले . निवेदनात म्हटले आहे, यावर्षी देवळा तालुक्यात भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे . देवळा तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे . तालुक्यातील बहुतांश छोटे-मोठे पाझर तलाव कोरडेठाक पडल्याने त्यावर अवलंबून असलेल्या पाणी पुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे . रामेश्वर ता. देवळा येथील किशोर सागर धरणात अत्यल्प पाणी साठा शिल्लक असून, ऐन उन्हाळ्यात पिण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी रामेश्वरचे उपसरपंच विजय पगार ,वाजगावचे उपसरपंच दीपक देवरे , संजय गायकवाड, जगन्नाथ देवरे ,अरु ण देवरे ,अमोल देवरे ,शैलेंद्र देवरे ,प्रदीप देवरे ,सुधाकर देवरे ,विठोबा देवरे आत्माराम देवरे ,प्रशांत देवरे आदींसह शेतकरी उपस्थित होते .
रामेश्वर धरणात चणकापूरचे पाणी सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 17:43 IST
निवेदन : देवळ्यात भीषण पाणीटंचाई
रामेश्वर धरणात चणकापूरचे पाणी सोडण्याची मागणी
ठळक मुद्दे तालुक्यातील बहुतांश छोटे-मोठे पाझर तलाव कोरडेठाक पडल्याने त्यावर अवलंबून असलेल्या पाणी पुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत