भारनियमनात कपात करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 18:25 IST2018-10-30T18:24:29+5:302018-10-30T18:25:21+5:30
उमराणेसह परिसरात सिंगल फेज योजनेद्वारे सुरू असलेल्या वीजपुरवठ्याच्या भारनियमनात कपात करून वेळेत बदल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना शहर शाखा व ग्रामहितवादी युवक संघटनेच्या वतीने करण्यात आली असून, उमराणे कक्ष- १ चे सहायक अभियंता दीपक गुप्ता यांना तसे निवेदन देण्यात आले आहे.

सिंगल फेज योजनेच्या भारनियमनात कपात व वेळेत बदल करण्यासंबंधीचे निवेदन सहायक अभियंता गुप्ता यांना देताना शिवसेनेचे भरत देवरे व कार्यकर्ते.
उमराणे : उमराणेसह परिसरात सिंगल फेज योजनेद्वारे सुरू असलेल्या वीजपुरवठ्याच्या भारनियमनात कपात करून वेळेत बदल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना शहर शाखा व ग्रामहितवादी युवक संघटनेच्या वतीने करण्यात आली असून, उमराणे कक्ष- १ चे सहायक अभियंता दीपक गुप्ता यांना तसे निवेदन देण्यात आले आहे. विद्युत वितरण कंपनीकडून उमराणेसह परिसरातील शेत वस्त्यांवर सिंगल फेज योजनेद्वारे वीजपुरवठा केला जातो; परंतु गेल्या काही दिवसांपासून या पुरवठ्यात तब्बल सहा तासांचे भारनियमन केले जात असून, आठवड्याचे चार दिवस सायंकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत वीज गायब होत असल्याने शेतात व वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय सद्य:स्थितीत शालेय विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा सुरू असल्याने विजेअभावी अभ्यासावर याचा विपरीत परिणाम होत आहे. येत्या काही दिवसात दिपावलीचा सण असल्याने या काळात रात्रीची वीज असणे गरजेचे असल्याने वीज वितरण कंपनीने भारनियमनात तीन तासांची कपात करून रात्रीऐवजी दिवसा भारनियमन करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख भरत देवरे, ग्रामहितवादी संघटनेचे अध्यक्ष भगवान देवरे, शिवसेना शहरप्रमुख दीपक देवरे, बंटी देवरे, राहुल शिंदे, संभाजी देवरे, अविनाश देवरे, तुषार देवरे, ललित पगारे,नामदेव देवरे, दादा शेख,चेतन निकम आदी उपस्थित होते. @