शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

वर्गणीच्या विरोधात दंडाची मागणी

By admin | Updated: April 9, 2017 00:27 IST

नाशिक : बैठकीसाठी हजर न राहणाऱ्या व्यावसायिकांना पाच हजार रुपये दंडाची शिक्षा फर्मावल्याने सातपूर परिसरातील व्यावसायिक संभ्रमात सापडले आहेत.

 नाशिक : राष्ट्रपुरुषांची जयंती वा पुण्यतिथीच्या निमित्ताने व्यावसायिकांकडून बळजबरीने होणारी वर्गणी वसुली रोखण्यासाठी एका नगरसेवकाने बोलाविलेल्या बैठकीकडे व्यावसायिकांनीच पाठ फिरविल्याने सदर नगरसेवकाने पुन्हा त्याच विषयावर बैठक आयोजित करून, बैठकीसाठी हजर न राहणाऱ्या व्यावसायिकांना पाच हजार रुपये दंडाची शिक्षा फर्मावल्याने सातपूर परिसरातील व्यावसायिक संभ्रमात सापडले आहेत. सदर नगरसेवक एवढ्यावरच थांबले नाहीत, तर वर्गणी वसूल करणाऱ्यांकडून जर व्यावसायिकांना त्रास झालाच तर आपण कोणतेही सहकार्य करणार नसल्याचे लेखी पत्रच व्यावसायिकांना वाटप केल्यामुळे एकीकडे वर्गणी वसुली करणाऱ्या समाजकंटकांचा त्रास व दुसरीकडे नगरसेवकाची धमकी अशा पेचात सापडून व्यावसायिक भयभीत झाले आहेत. कोणालाही कोणत्याही प्रकारची वर्गणी देऊ नये, यासाठी सदर नगरसेवकाने गेल्या रविवारी सायंकाळी सहा वाजता आपल्या प्रभागातील गणेश- श्रीकृष्ण मंदिरात व्यावसायिकांची बैठक बोलाविली होती. परंतु या बैठकीकडे व्यावसायिकांनी पाठ फिरविली. त्यामुळे आता पुन्हा रविवार, दि. ९ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता त्याच मंदिरात बैठक बोलाविण्यात आली असून, त्यासाठी नगरसेवकाच्या लेटरहेडवर प्रभागातील सर्व दुकानदार, व्यावसायिकांना पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रात नगरसेवकाने गेल्या बैठकीला व्यावसायिक न आल्याचा उल्लेख करून ही बैठक तुमच्या फायद्यासाठीच असून, बैठकीस न आल्यास पाच हजार रुपये दंड करण्यात येईल, तसेच भविष्यात व्यावसायिकांना समाज कंटकांकडून व गुंडांकडून काही त्रास झाल्यास त्यामध्ये भाग घेणार नसल्याचा इशारा दिला आहे.