मालेगावी सावित्रीबाई फुले उद्यानाच्या पूर्वेस गाळ्यांची मागणी
By Admin | Updated: January 22, 2016 22:37 IST2016-01-22T22:30:09+5:302016-01-22T22:37:55+5:30
मालेगावी सावित्रीबाई फुले उद्यानाच्या पूर्वेस गाळ्यांची मागणी

मालेगावी सावित्रीबाई फुले उद्यानाच्या पूर्वेस गाळ्यांची मागणी
मालेगाव : येथील किदवाई रस्त्यावरील सावित्रीबाई फुले उद्यानाच्या पूर्वेस हॉकर्स गाळे तयार करण्यात यावे, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे किदवाई हॉकर्स युनियनचे सचिव फिरदोसी मोहमद फारूक यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात या ठिकाणी गाळे बांधण्यासाठी पालिका असताना अनेक निवेदने देण्यात आली होती. याविषयी येथील महासभेने ठराव केलेला आहे. याविषयी प्रभाग २ च्या समितीने नकाशासह अभिप्राय व संमती करून दिलेली आहे. निवेदनात येथील हॉकर्सला पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.