चांदवड : येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. मंडलिक यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी येथील जुबेर अहमद अब्दुल गफ्फार तांबट यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. जुबेर तांबट हे चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात न्यायालयाच्या कामासाठी सर्टिफिकेट आणण्यासाठी गेले असता त्यांना डॉ. मंडलिक यांनी अरेरावी करून जातिवाचक शब्द उचारले, तर गेल्या महिन्यापासून वेळोवेळी सर्टिफिकेटची मागणी केली असता त्यांनी पैशांची मागणी केली.या डॉक्टरांची चौकशी करावी, अशी मागणी जुबेर तांबट यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत विभागाचे अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. (वार्ताहर)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}