निरपूरच्या युवकाच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 01:04 IST2020-07-31T23:22:25+5:302020-08-01T01:04:27+5:30

सटाणा : तालुक्यातील जुने निरपूर येथील तेवीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तेजस महादू सूर्यवंशी असे या युवकाचे नाव आहे. त्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जिल्हा पोलीसप्रमुख आरती सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Demand for inquiry into the death of Nirpur youth | निरपूरच्या युवकाच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी

निरपूरच्या युवकाच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी

सटाणा : तालुक्यातील जुने निरपूर येथील तेवीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तेजस महादू सूर्यवंशी असे या युवकाचे नाव आहे. त्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जिल्हा पोलीसप्रमुख आरती सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जुने निरपूर येथील संगीता व संजय महादू सूर्यवंशी हे चौगाव येथील वीटभट्टीवर मोलमजुरी करतात. त्यांचा मुलगा तेजस गेल्या वर्षभरापासून भरतीपूर्व पोलीस दलाचे प्रशिक्षण घेत होता. १३ जुलैला त्याचा मित्र रोहित सीताराम घोडे (रा. भंडारपाडा) याने नोकरीचे आमिष दाखवून त्याला नाशिकला नेल्याची तक्र ार निवेदनात केली आहे. रोहितकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सहा दिवसांनी तेजसचा अपघाती मृत्यू झाल्याचा निरोप आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Demand for inquiry into the death of Nirpur youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.