दिंडोरी : पंचवटी एक्सप्रेस संलग्न नाशिकरोड ते दिंडोरी व दिंडोरी ते नाशिकरोड बस सुरु करावी या मागणीचे निवेदन शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्यावतीने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना देण्यात आले.दिंडोरी येथुन मुंबईला व्यावसायिक व ईतर लोकही नेहमी जात असतात, मात्र दिंडोरी येथुन पहाटे नाशिकरोडला जाण्यासाठी बस नसल्याने प्रवाशांना पंचवटी एक्सप्रेस पकडण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे परिवहन विभागाने बस सुरु करु न प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचेकडे शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हाप्रमुख सुरेश देशमुख, तालुकाप्रमुख अशोक निकम, कार्यालयीन तालुकाप्रमुख सागर जाधव, उपतालुकाप्रमुख एकनाथ काळोगे, आनंद घाडगे, गट प्रमुख अविनाश नागरे, शहरप्रमुख दिपक करंडे, संतोष पगार, संतोष देशमुख, श्रीराम देवकर, दत्तात्रय शार्दुल, विजय चव्हाण आदींनी केली आहे.
पंचवटी एक्सप्रेस संलग्न नाशिकरोड ते दिंडोरी बससेवा सुरु करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 18:10 IST
दिंडोरी : पंचवटी एक्सप्रेस संलग्न नाशिकरोड ते दिंडोरी व दिंडोरी ते नाशिकरोड बस सुरु करावी या मागणीचे निवेदन शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्यावतीने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना देण्यात आले.
पंचवटी एक्सप्रेस संलग्न नाशिकरोड ते दिंडोरी बससेवा सुरु करण्याची मागणी
ठळक मुद्दे प्रवाशांना पंचवटी एक्सप्रेस पकडण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.