नोकर भरतीसाठी जात पडताळणी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 13:49 IST2020-07-14T13:49:18+5:302020-07-14T13:49:52+5:30
वेळुंजे(त्र्यंबकेश्वर) : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील स्वाभिमानी आदिवासी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय नोकर भरतीसाठी जात पडताळणीबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याशी चर्चा केली.

नोकर भरतीसाठी जात पडताळणी करण्याची मागणी
वेळुंजे(त्र्यंबकेश्वर) : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील स्वाभिमानी आदिवासी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय नोकर भरतीसाठी जात पडताळणीबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याशी चर्चा केली.
या चर्चेत झिरवाळ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच शिक्षकांनी उपस्थित केलेल्या नवीन नोकर भरती जात पडताळणीबाबत ही आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले. पेसा क्षेत्रातील बांधवांना बदलीसाठी प्रथम संधी देण्यात यावी, केंद्र शाळेत कायमस्वरूपी क्लर्क देण्यात यावा, २००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू करावी, पेसा क्षेत्रातील मुख्याध्यापक पदोन्नतीने १०० टक्के जागा भराव्यात आदी मागण्यांही झिरवाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
यावेळी स्वाभिमानी आदिवासी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष काशिनाथ भोईर,जिल्हाध्यक्ष मोतीराम नाठे, सरचिटणीस मोहन शेंडे, कोषाध्यक्ष संजय गवळी, त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष नवनीत झोले , अंबादास चौधरी,दिलीप बेंडकोळी, अंबादास खोटरे,रविंद्र लहारे ,संतोष थोरात,देवराम वाघेरे,रमेश महाले,संतोष कामडी,गोडे आदीसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.