म्हाळोबा यात्रेसाठी भोजापूरच्या आवर्तनाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:03 IST2018-01-24T23:36:51+5:302018-01-25T00:03:55+5:30

सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील जागृत देवस्थान श्री म्हाळोबा महाराज यात्रोत्सव सोमवारपासून (दि.२९) सुरू होत आहे. यात्रेसाठी राज्यातील लाखो भाविक हजेरी लावतात. त्या पार्श्वभूमीवर भोजापूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याकडे ग्रामस्थांनी केली आहे.

Demand for Bhojapur's recurrence for Mhaloba yatra | म्हाळोबा यात्रेसाठी भोजापूरच्या आवर्तनाची मागणी

म्हाळोबा यात्रेसाठी भोजापूरच्या आवर्तनाची मागणी

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील जागृत देवस्थान श्री म्हाळोबा महाराज यात्रोत्सव सोमवारपासून (दि.२९) सुरू होत आहे. यात्रेसाठी राज्यातील लाखो भाविक हजेरी लावतात. त्या पार्श्वभूमीवर भोजापूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याकडे ग्रामस्थांनी केली आहे. राज्यातील धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या म्हाळोबा यात्रेला भोजापूर धरणातून पाणी सोडण्याची गरज आहे. दरवर्षी सोडण्यात येणाºया पाण्यामुळे भाविकांची अडचण दूर होते. यंदाही पाणी सोडण्याची मागणी दोडी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. सरपंच लीला कैलास सांगळे, उपसरपंच अरुण पवार यांच्यासह पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी भागवत घुगे, कारभारी शिंदे, पाराजी शिंदे, विष्णू साबळे आदींनी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, मुख्य कार्यकारी  अभियंता राजेंद्र शिंदे यांना दिले  आहे.

Web Title: Demand for Bhojapur's recurrence for Mhaloba yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.