शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

कर्जमाफी देणं हे येड्यागबाळ्याचं काम नाही, धनंजय मुंडे यांचा सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 9:27 PM

२००८ साली पवार साहेबांनी ७१ हजार कोटींची कर्जमाफी विनासायास आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात दिली होती. पण सरकारला इतके महिने होऊनही कर्जमाफी द्यायला जमली नाही. शेवटी 'इथे पाहिजे जातीचे हे येड्यागबाळ्याचे काम नाही'  अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सटाणाच्या जाहीर सभेत सरकारला टोला लगावला.

नाशिक -  २००८ साली पवार साहेबांनी ७१ हजार कोटींची कर्जमाफी विनासायास आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात दिली होती. पण सरकारला इतके महिने होऊनही कर्जमाफी द्यायला जमली नाही. शेवटी 'इथे पाहिजे जातीचे हे येड्यागबाळ्याचे काम नाही'  अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सटाणाच्या जाहीर सभेत सरकारला टोला लगावला.

यावेळी पुढे बोलतांना मुंडे म्हणाले की, हल्लाबोल यात्रेचा हा तिसरा टप्पा चालू आहे. मला विश्वास आहे जेव्हा पाचवा टप्पा संपायला येईल तोपर्यंत राज्यातील भाजपचे सरकार उलथायला सुरुवात झालेली असेल.भाजपला मत देऊन आमच्याकडून चूक झाली, असा संदेश लिहिलेले डिजिटल फलक देशात सर्वात पहिल्यांदा सटाणा तालुक्यात लागले होते. हा तालुका जे बोलला ते आता महाराष्ट्र आणि देश बोलू लागला आहे. 2014 झालेली ही चूक आता 2019 ला दुरुस्त करायची असल्याचे आवाहन केले. मोदीजींनी निवडणुकीआधी १५ लाख प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर येतील असं सांगितलं. ते तर सोडाच पण विजय मल्ल्या, नीरव मोदी हजारो कोटी बुडवून पळालेत त्यावरून जनतेच्याच डोक्यावर प्रत्येकी १५ लाख कर्ज होते की काय,  अशी भीती धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

हो गयी भूल कमल का फूल हा विचार लक्षात ठेवा – सुनील तटकरेहो गयी भूल कमल का फूल हा विचार लक्षात घेवून या सरकारला वठणीवर आणण्याचा निर्धार करुन कामाला लागूया असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सटाणाच्या जाहीर सभेत केले. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना नाशिकचा जास्तीत जास्त भाग ओलिताखाली आणला होता. मी जलसंपदा मंत्री म्हणून काम करत असताना नाशिक जिल्ह्यातील अनेक प्रकल्प मार्गी लावले होते.नार-पार, दमणगंगाचे पाणी गुजरातला जावू देणार नाही असा निर्धार आज करुया त्यासाठी आपल्याला पुन्हा हल्लाबोल करावा लागला तरी तो आम्ही करु असे आश्वासनही तटकरे यांनी दिले. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. त्यासाठी हल्लाबोल करण्याची गरज आहे. जसा रात्री नंतर पुन्हा दिवस उजाडतो. त्याप्रमाणे भाजपाची सत्ताही जाणार आहे, असेही तटकरे म्हणाले.

तीन वर्षांत महाराष्ट्रात स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण वाढले- खासदार सुप्रिया सुळेतीन वर्षात महाराष्ट्रात स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण वाढले आहे त्यामुळे राज्यातील मुलींची संख्या घटल्याचे नीती आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे. एकीकडे बेटी बचाओ, बेटी पढाओ अशी भल्यामोठया जाहीराती केल्या जात आहेत आणि दुसरीकडे मुलींची संख्या घटत आहे. त्यामुळे आज लेकी नको गं म्हणण्याची वेळ राज्यातील लोकांवर आलीय की काय अशी शंका मला येते असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी सटाणाच्या जाहीर सभेत व्यक्त करतानाच सरकारबद्दल संतापही व्यक्त केला.त्यांनी या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यास शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला हमीभाव देण्याचा आणि सटाणा कुपोषणमुक्त करण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन दिले. सभेमध्ये युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्रामकोतेपाटील, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, आमदार दिपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण यांनी आपले विचार व्यक्त केले. सभेच्या सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,खासदार सुप्रिया सुळे,विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे सटाणा ठिकाणी प्रवेश करतानाच जोरदार स्वागत करण्यात आले.सभेच्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या महापुरुषांच्या प्रतिमांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे,धनंजय मुंडे यांनी अभिवादन केले. या सभेमध्ये भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे,विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

या सभेला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार दीपिका चव्हाण, आमदार पंकज भुजबळ, आमदार जयंत जाधव, आमदार जयदेव गायकवाड, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील,विद्यार्थी अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, माजी आमदार संजय चव्हाण, माजी खासदार आनंद परांजपे, रंजन ठाकरे, अविनाश आदिक, प्रेरणा बलकवडे आदींसह बागलाण आणि सटाणा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकDhananjay Mundeधनंजय मुंडे