शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

हरकतींच्या निकालाला विलंब, आज होणार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

By admin | Updated: March 25, 2015 01:00 IST

जिल्हा बॅँक निवडणूक : पाचशे मतदार वाढले?

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या प्राप्त तक्रारी व हरकतींवर वेळापत्रकानुसार २३ मार्चला निकाल देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात २४ मार्चच्या सायंकाळपर्यंतही निकाल देण्यास विलंब झाल्याचे समजते. दरम्यान, जिल्हा बॅँकेच्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे २५ मार्चला अंतिम प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.दरम्यान, विभागीय सहनिबंधक तथा जिल्हा सहकार निवडणूक निर्णय अधिकारी एम. ए. आरिफ यांना नियोजित वेळापत्रकानुसार २३ मार्चलाच प्राप्त हरकतींवर निकाल देणे अपेक्षित असताना या निकालाबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आल्याचे, तसेच २४ मार्चच्या सायंकाळपर्यंत निकाल तयार करण्याचेच काम सुरू असल्याचे समजते.अगोदर असलेल्या सुमारे चार हजारांच्या आसपास मतदारांमध्ये प्राप्त ५४७ तक्रारींपैकी बहुसंख्य तक्रारी या पाच हजार रुपयांच्या भागभांडवलाच्या असल्याच्या व त्या स्वीकारण्यात आल्याने जिल्हा बॅँकेच्या एकूण मतदारांमध्ये सुमारे पाचशेने वाढ झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या मतदारांची संख्या सुमारे साडेचार हजाराच्या घरात पोहोचल्याचे कळते. प्रत्यक्षात २५ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत यादी जाहीर झाल्यानंतरच मतदारांची अंतिम संख्या कळणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार २५ मार्च रोजीच यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, या अंतिम प्रारूप याद्या विभागीय सहनिबंधक व जिल्हा उपनिबंधक कार्यालयासह तालुका सहनिबंधक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या मतदार यादीवर ५४७ तक्रारी व ६९ हरकती प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सर्व ६९ तक्रारींवर निकाल देण्यात येणार आहेत.(प्रतिनिधी)