प्रश्नपत्रिका उशिरा मिळाल्याने विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 01:54 IST2018-11-01T01:54:29+5:302018-11-01T01:54:48+5:30

पुणे विद्यापीठाकडून कामगार कायदा या विषयाची प्रश्नपत्रिका मिळण्यास अर्धा तास विलंब झाल्याने विद्यापीठाचा गोंधळी कारभार पुन्हा समोर आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. विद्यापीठाने परीक्षेचा वेळ अर्धा तास वाढवून दिल्याने परीक्षा सुरळीत पार पडली.

 Delay due to late papers | प्रश्नपत्रिका उशिरा मिळाल्याने विलंब

प्रश्नपत्रिका उशिरा मिळाल्याने विलंब

नाशिक : पुणे विद्यापीठाकडून कामगार कायदा या विषयाची प्रश्नपत्रिका मिळण्यास अर्धा तास विलंब झाल्याने विद्यापीठाचा गोंधळी कारभार पुन्हा समोर आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. विद्यापीठाने परीक्षेचा वेळ अर्धा तास वाढवून दिल्याने परीक्षा सुरळीत पार पडली.
पुणे विद्यापीठाच्या विधि महाविद्यालयाच्या परीक्षा सध्या सुरू असून, बुधवारी सकाळी १० वाजता कामगार कायदा विषयाची परीक्षा सुरू
होणार होती; मात्र आॅनलाइन मिळणारी प्रश्नपत्रिका साडेदहा वाजले तरीही परीक्षाकेंद्रांना उपलब्ध न झाल्याने काहीसा गोंधळ निर्माण झाला.
त्यामुळे अन्य विषयांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध होऊनही संपूर्ण परीक्षा प्रक्रि या तब्बल अर्धा तास उशिराने सुरू करावी लागली. याप्रकारामुळे विद्यार्थ्यांना विनाकारण अर्धा तास ताटकळत बसावे लागले तर परीक्षा व्यवस्थापन करणाऱ्या केंद्रचालकांनाही त्रास सहन करावा लागला.  या साºया प्रकारानंतर विद्यार्थ्यांनी विचारणा करण्यास सुरु वात केल्याने केंद्रप्रमुखांनाही रोषाला सामोरे जावे लागले. तांत्रिक कारणामुळे विलंब झाल्याचे सांगूनही विद्यार्थी ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने काहीशा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर तीस ते चाळीस मिनिटे उशिरा परीक्षा प्रक्रि या सुरू करण्यात आली. दरम्यान, असाच प्रकार नाशिकसह संगमनेर व अन्य परीक्षा केंद्रांवर झाल्याचे समजते.
आॅनलाइन यंत्रणा अपयशी
प्रश्नपत्रिका फुटू नये यासाठी विद्यापीठांकडून परीक्षेच्या काही वेळ आधी आॅनलाइन पद्धतीने प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांना पाठविल्या जातात. विधि परीक्षेतील कामगार कायदा विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांना नियोजित वेळेत उपलब्ध झाली नाही.

Web Title:  Delay due to late papers