अपघातास कारणीभूत ठरल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा: विश्वास नांगरे-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:58 IST2019-05-04T00:56:50+5:302019-05-04T00:58:49+5:30
शहरात मागील वर्षभरात झालेले अपघात व सद्यस्थितीतील अपघातांचे प्रमाणे काही प्रमाणात कमी झाले असले तरी यावर्षी जानेवारीपासून एप्रिलपर्यंत ५९ अपघातांमध्ये ६३ नागरिकांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. यानुसार दिवसाआड एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू होत असून, हे प्रमाण चिंताजनक आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी शहर पोलिसांकडून काटेकोर उपाययोजना सुरू असून, यापुढे वाहतूक नियमांचे उल्लंघन करून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी शुक्रवार (दि.३) पत्रकार परिषदेत दिली.

अपघातास कारणीभूत ठरल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा: विश्वास नांगरे-पाटील
नाशिक : शहरात मागील वर्षभरात झालेले अपघात व सद्यस्थितीतील अपघातांचे प्रमाणे काही प्रमाणात कमी झाले असले तरी यावर्षी जानेवारीपासून एप्रिलपर्यंत ५९ अपघातांमध्ये ६३ नागरिकांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. यानुसार दिवसाआड एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू होत असून, हे प्रमाण चिंताजनक आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी शहर पोलिसांकडून काटेकोर उपाययोजना सुरू असून, यापुढे वाहतूक नियमांचे उल्लंघन करून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी शुक्रवार (दि.३) पत्रकार परिषदेत दिली.
हेल्मेटशिवाय दुचाकी वाहन चालविणे, सीटबेल्टचा वापर न करणे, वाहतूक नियम तोडणे यामुळे अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढले असून, अशाप्रकार वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघात झाल्यास संबंधित चालकावरच सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले. तसेच, वाहतूक नियमांची जनजागृती व हेल्मेटसक्तीबाबत १३ मे पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या दहा दिवसांच्या कालावधीत नागरिकांनी हेल्मेट उपलब्ध व इतर नियम अभ्यासून घ्यावेत.
अपघातांमध्ये घट
शहरात जानेवारी ते एप्रिलदरम्यान गेल्यावर्षी ६९ अघातात ७० मत्यू
४ २१३ अपघातांमध्ये एकूण २२२ जण जखमी
४ यावर्षी ५९ अपघातांमध्ये ६३ जणांचा मृत्यू झाला.
४ दुचाकीच्या अपघातात ३८ मृत्यू (३५ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचा समावेश)
४ सीटबेल्ट नसल्याने चारचाकी अपघातात चार मृत्यू
४ आठ पादचारी, ३ सायकलस्वारांसह अन्य दहा जणांचा मृत्यू
४ ८८ गंभीर व ३१ किरकोळ असे १७८ अपघातात १८३ जण जखमी