शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

बाळंतवेदनांतून "तिने" केली हरिणीची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 11:05 PM

नगरसूल : येवला तालुक्यातील कोळगाव-ममदापूर शिवाराजवळील तरुळी भागात शेताजवळ गर्भवती असलेल्या हरिणीच्या बाळंतवेदना पाहून मदतीला धावलेल्या एका महिलेने त्यातून तिची सुखरूप सुटका केली; परंतु हरिणीच्या पाडसाचा जीव मात्र वाचवण्यात यश आले नाही.

ठळक मुद्देमातेच्या वेदना मातेलाच उमगल्या : पाडसाचा मात्र मृत्यू

नगरसूल : येवला तालुक्यातील कोळगाव-ममदापूर शिवाराजवळील तरुळी भागात शेताजवळ गर्भवती असलेल्या हरिणीच्या बाळंतवेदना पाहून मदतीला धावलेल्या एका महिलेने त्यातून तिची सुखरूप सुटका केली; परंतु हरिणीच्या पाडसाचा जीव मात्र वाचवण्यात यश आले नाही.शेतकरी रमेश शिंदे, त्यांची पत्नी कल्पना, मुलगा अविनाश हे शेतात काम करीत असताना शेताच्या मागील बाजूस काही अंतरावर एक हरिण दिसले. त्या भागात हरणांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शिंदे यांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले; परंतु कल्पना शिंदे यांना सदर हरणाची काही तरी अडचण असल्याचे लक्षात आले व त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता सदर मादी हरिण गर्भवती असल्याने तिला उठता येत नसल्याचे लक्षात आले. कल्पना शिंदे यांनी तिची तडफड पाहून पती व मुलाला मदतीला बोलावले व तिचे अर्धवट अडकलेले पाडस बाहेर काढले. हरिणीचे प्राण वाचले. मात्र, पाडसाने प्राण सोडला. यावेळी हरिणी वेदनेने विव्हळत होती. दरम्यान, वनविभागाचे वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ यांना सदर घटनेची माहिती भाऊलाल कुडके यांनी दिल्यानंतर काही वेळातच वनविभागाचे कर्मचारी वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती पाहून मृत पाडस जवळच खड्ड्यात पुरले व हरिणीला येवला येथे वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब होन यांच्याकडे उपचारासाठी नेले. त्यावेळी डॉ. होन यांनी तात्काळ औषधोपचार केल्याने हरिणीचा जीव वाचला.सदर हरिण सुमारे दीड ते दोन तास अर्धवट अवस्थेत पाडस अडकल्याने मृत्यूशी झुंज देत होती; परंतु कल्पना शिंदे यांनी हिंमत दाखवत केलेल्या मदतीमुळे हरिणीचे प्राण वाचले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कल्पना यांच्यासह या शेतकरी कुटुंबाचे कौतुक केले.अशा घटना घडतात; पण त्याकडे काही लोक कानाडोळा करतात. शिंदे यांच्या सारख्या लोकांनी प्रसंगावधान राखून घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ दखल घेतली. हरिण अडलेल्या अवस्थेत पाहून दोन जीव मृत्यूशी झुंज देत असताना शिंदे यांनी धाडस करत हरिणीला जीवदान दिले. दोन दिवस औषधोपचार करून या हरिणीला राजपूत वनसंवर्धन क्षेत्रात सोडण्यात येणार आहे.- ज्ञानेश्वर वाघ, वनरक्षक, राजापूर. 

टॅग्स :forestजंगलSocialसामाजिक