वनवासी वसतिगृहाचा उद्या लोकार्पण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 22:40 IST2022-05-16T22:39:55+5:302022-05-16T22:40:25+5:30

घोटी : विश्व हिंदू परिषद संचालित वनवासी विद्यार्थी वसतिगृहाच्या विस्तारित इमारतीचे लोकार्पण घोटी येथे बुधवारी (दि. १८) श्रीराम जन्मभूमी न्यास, अयोध्या येथील कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Dedication ceremony of Vanvasi hostel tomorrow | वनवासी वसतिगृहाचा उद्या लोकार्पण सोहळा

गोविंद देव गिरी

ठळक मुद्देघोटी गावात तालुका व परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी

घोटी : विश्व हिंदू परिषद संचालित वनवासी विद्यार्थी वसतिगृहाच्या विस्तारित इमारतीचे लोकार्पण घोटी येथे बुधवारी (दि. १८) श्रीराम जन्मभूमी न्यास, अयोध्या येथील कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

घोटी गावात तालुका व परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वास्तव्य करता यावे म्हणून विश्व हिंदू परिषदेने वनवासी विद्यार्थी वसतिगृहाची निर्मिती केली असून, छोट्याशा जागेतून मोठ्या वास्तूत विस्तारित इमारतीचे लोकार्पण बुधवारी दुपारी ४ वाजता होणार आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन वनवासी दुर्बल घटक न्यास, विश्व हिंदू परिषद प्रखंड, इगतपुरी, वनवासी विद्यार्थी वसतिगृह समिती व बजरंग दल, इगतपुरी यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्व हिंदू परिषदेचे मनोहर घोडे, जिल्हा ग्रामीण मंत्री देविदास वारुंगसे, प्रखंड अध्यक्ष संपतराव म्हसणे व प्रखंड मंत्री अशोक राजगुरू आदी प्रयत्नशील आहेत.

Web Title: Dedication ceremony of Vanvasi hostel tomorrow