कमी पावसाने खतांच्या विक्रीत घट

By Admin | Updated: October 9, 2015 01:15 IST2015-10-09T01:14:59+5:302015-10-09T01:15:30+5:30

कमी पावसाने खतांच्या विक्रीत घट

Decrease in sales of fertilizers by low rainfall | कमी पावसाने खतांच्या विक्रीत घट

कमी पावसाने खतांच्या विक्रीत घट

  नाशिक : यंदाच्या मोसमात पावसाने अपेक्षित हजेरी न लावल्याने बळीराजाने खतांच्या खरेदीकडेही पाठ फिरविल्याचे खत विक्रीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. खरीप हंगामासाठी १ लाख ८८ हजार ४२५ मेट्रिक टन खतांची उपलब्धता असताना प्रत्यक्षात १ लाख ५४ हजार ९६३ मेट्रिक टनच खतांची विक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, येत्या रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने २ लाख ३६ हजार मेट्रिक टन खतांची मागणी केलेली असताना प्रत्यक्षात जिल्'ासाठी २ लाख ११०० मेट्रिक टन खत आवंटन मंजूर झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आता त्यात या खरीप हंगामातील ३३ हजार ४६३ मेट्रिक टन शिल्लक खतांची भर पडणार असल्याने रब्बीसाठी मुबलक प्रमाणात खते उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Decrease in sales of fertilizers by low rainfall