शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

नगरपरिषद शाळातील घटती विद्यार्थी संख्या चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 00:55 IST

नांदगांव (संजीव धामणे) : शैक्षणिक सुविधांचा जणू दुष्काळ पडल्याने, नांदगाव नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या शाळा विद्यार्थ्यांविना ओस पडू लागल्याची प्रचिती या शाळांना येत आहे. दरवर्षी कमी होत जाणाऱ्या विद्यार्थी संख्येने शिक्षण मंडळाला लागलेले ग्रहण अनाकर्षक व कमकुवत होत चाललेल्या वास्तुंमुळे अधिक गडद होत चालल्याने, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांची शहरातली शैक्षणिक कवाडे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. आजच्या घडीला सात शाळा मिळून २९ शिक्षक उरले आहेत.

ठळक मुद्देशैक्षणिक सुविधांचा अभाव : सात शाळांसाठी केवळ २९ शिक्षक

नांदगांव (संजीव धामणे) : शैक्षणिक सुविधांचा जणू दुष्काळ पडल्याने, नांदगाव नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या शाळा विद्यार्थ्यांविना ओस पडू लागल्याची प्रचिती या शाळांना येत आहे. दरवर्षी कमी होत जाणाऱ्या विद्यार्थी संख्येने शिक्षण मंडळाला लागलेले ग्रहण अनाकर्षक व कमकुवत होत चाललेल्या वास्तुंमुळे अधिक गडद होत चालल्याने, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांची शहरातली शैक्षणिक कवाडे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. आजच्या घडीला सात शाळा मिळून २९ शिक्षक उरले आहेत.गेल्या काही वर्षांत शाळांची संख्या दहावरून सातवर आली असून, विद्यार्थी संख्या १,२०० वरून ६२७ वर आली आहे. सध्या चार मराठी व तीन उर्दू माध्यमांच्या शाळा सुरू आहेत. त्यात अनुक्रमे ३०९ व २५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एके काळी शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रम दणक्यात साजरे करण्यात येत असत. रस्त्यावरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मिरवणुकीत सामील होणारे व शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षणप्रेमी शाळांमध्ये हजेरी लावतांना दिसून येत.आज परिस्थिती बदलली आहे. तुटपुंजे अनुदान, शाळांच्या परिस्थितीकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष यामुळे चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होऊ शकत नसल्याचे दिसून येत आहे. शाळा नंबर १० मध्ये तीन वर्ग खोल्यांमध्ये सात वर्ग बसतात. सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात एक, सहा व आठ नंबर अशा तीन शाळा भरतात. सदर इमारतीच्या वरच्या मजल्यावर आठ खोल्या असून, त्यातल्या चार खोल्या पाणी गळतीमुळे व पडझड झाल्याने शेवटच्या घटका मोजत आहेत. या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले, त्यात इमारतीचे काम त्वरित करण्याची आवश्यकता आहे.भाड्याची इमारतहमालवाड्यावरची शाळा नं. २ असून, ती भाड्याची इमारत आहे. मालक दुरुस्तीसाठी खर्च करायला तयार नसल्याने, शिक्षकांनी स्वखर्चाने कौले बसविली, व्हरांडे दुरुस्त केले. बहुतांश इमारतीमध्ये पाण्याची सोय नाही. वीजपुरवठ्यातल्या तक्रारी, शैक्षणिक साहित्याचा अभाव, यामुळे विद्यादानात अडचणी निर्माण झाल्या असून, या परिस्थितीत तातडीने सुधारणा होणे गरजेचे आहे. गेल्या दशकात ८१ शिक्षक असलेल्या शिक्षण मंडळाच्या सभापतीपदी निवड होण्यासाठी इच्छुकांची उडीवर उडी पडत असे. शिक्षण मंडळ चालविण्याची जबाबदारी प्रशासनाधिकारी यांचेवर आहे. त्यांचेकडे मनमाड व नांदगाव या दोन ठिकाणांचा पदभार आहे. भौतिक सुविधा संगणक, टीव्ही, रंगीत भिंती, उत्तम सजावट रंग व समर्पक भित्तीचित्रे यांची गरज आहे, शिक्षक अनुभवी आहेत. कोरोनातून बाहेर आलो की, अनुदान व लोकसहभागातून उपयुक्त साहित्य खरेदी विचाराधीन आहे.- निर्मला चंद्रमोरे, प्रशासनाधिकारी

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी