शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मूर्ती संकलनात घट हे पर्यावरण जागृतीचे द्योतक; अंनिसचे महेंद्र दातरंगे यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 23:48 IST

नाशिक- पर्यावरण स्नेही गणेश विसर्जनासाठी महापालिका आणि सेवाभावी संस्थांनी यंदाही मूर्ती संकलन केले असले तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत १३ हजाराने मूर्ती संकलन घटले आहे. अर्थात, मूर्ती न देणाऱ्यामध्ये वाढ झाली नसून नागरीकांत जागृकता झाल्याने आता नागरीक घरीच विसर्जन करीत आहेत, त्यामुळे मूर्ती संकलनात घट हे सुचिन्हच असल्याचे मत महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे जिल्हा कार्यवाह महेंद्र दातरंगे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देयंदा १ लाख १६ मूर्तींचे संकलन१३ हजाराने घटनागरीकांत जाणवते जागृती

नाशिक- पर्यावरण स्नेही गणेश विसर्जनासाठी महापालिका आणि सेवाभावी संस्थांनी यंदाही मूर्ती संकलन केले असले तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत १३ हजाराने मूर्ती संकलन घटले आहे. अर्थात, मूर्ती न देणाऱ्यामध्ये वाढ झाली नसून नागरीकांत जागृकता झाल्याने आता नागरीक घरीच विसर्जन करीत आहेत, त्यामुळे मूर्ती संकलनात घट हे सुचिन्हच असल्याचे मत महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे जिल्हा कार्यवाह महेंद्र दातरंगे यांनी व्यक्त केले.सव्वा दोन दशकांपूर्वी नाशिकमध्ये विसर्जित मूर्ती दानाची चळवळ रूजविणाºया अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये दातरंगे देखील सहभागी होते. त्यांच्याशी साधलेला संवाद..

प्रश्न: नाशिकमध्ये विसर्जित मूर्ती दानाच्या चळवळीला यंदा अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नाही असे वाटते का?दातरंगे: मला वाटते पर्यावरण स्नेही विसर्जनास दिवसेदिवस प्रतिसाद वाढत आहे. यंदा १ लाख १६ नागरीकांनी विसर्जित मूर्तींचे दान केले. गेल्यावर्षी पेक्षा ते कमी असले तरी यावेळी मुळात कोरोनाचा प्रभाव होता. त्यामुळे सार्वजनिक मंडळांची संख्या घटली आणि नागरीकांनी नेहेमीप्रमाणेच घरोेघर गणपती बसविल्यानंतर त्याचे विसर्जन घरीच केले. अलिकडे घरीच मूर्ती तयार करून विर्सजन घरीच बागेत करण्याची पध्दत रूढ झाली आहे. त्यामुळे किमान एक लाख मूर्तींचे तरी विर्सजन घरीच झाल्याचे दिसत आहे.

प्रश्न: दाभोलकर यांच्या या योजनेला प्रतिसाद वाढतोय का?दातरंगे: सव्वा दोन दशकांपूर्वी ही चळवण अंनिसने सुरू केली. गणपती ही बुध्दीची देवता मानली जाते मग बुध्दी वापरून हा उत्सव का केला जात नाही असे सांगून श्रध्दास्थानाला ठेच न पोहोचवता मोहिम सुरू झाली आणि आज ती संपुर्ण राज्यात वाढली आहेत. जेव्हा लोकचळवळ होते, तेव्हा त्यात राहायचे नाही ही दाभोलकर यांची भूमिका असल्याने नाशिकमध्ये महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कोणीही कार्यकर्ते मूर्ती संकलनासाठी उपस्थित राहत नाहीत.

प्रश्न: लोकांमध्ये पुरेसे प्रबोधन झाले आहे काय?दातरंगे: गेल्या पाच ते सात वर्षात नागरीकांमध्ये प्रबोधन झाले आहे. नागरीक स्वत: घरीच मुलांच्या माध्यमातून मूर्ती तयार करतात आणि त्याचे बागेत विसर्जन करतात. शाडु मूर्तीच्या घरगुती उत्सवात वापर केला जातोे. त्याच बरोबर प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्तींची अमोनियम बायोकार्बोनेटच्या माध्यमातून घरीच निर्गत केली जाते.मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरGanesh Mahotsavगणेशोत्सव