कर्जबाजारी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 07:32 PM2021-01-11T19:32:34+5:302021-01-12T01:24:50+5:30

सिन्नर : बेकायदेशीर कर्जाचे बळी ठरलेले कर्जदार शेतकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत बँका, सावकार, फायनान्स यांची दादागिरी व जप्ती थांबविण्याची मागणी केली, अन्यथा आम्हाला जीवन संपविण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहारचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जबाजारी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.

Debt-ridden farmers' sit-in agitation | कर्जबाजारी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

कर्जबाजारी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

Next

यावेळी सिन्नर व्यापारी बैंकेतील बेकायदेशीर कर्जांची चौकशी होऊन ज्याने लाखों रुपये कर्ज परस्पर घेतले, त्यांच्याकडूनच वसुली करावी. त्यांच्या मालमत्ता जप्त कराव्यात. विनाकारण गोरगरिबांच्या न घेतलेल्या कर्जासाठी जमिनी जप्ती करू नये, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. नगरपालिकेकडे असलेले २ कोटी वसूल का करत नाहीत? काही शेतकऱ्यांनी जमिनी विकून कर्ज १० ते १५ वर्षांपूर्वी फेडले. ना हरकत दाखले असताना पुन्हा कर्ज वसुली का? शेतकरी संकटात असताना शेतकऱ्यांची कर्ज वसुली थांबवा आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी दौलत धनगर, बापू सानप, बापू सानप, सुनील जगताप, सुनील गर्जे, सूरज सानप आदींसह समस्याग्रस्त शेतकरी शिवाजी गुंजाळ, भास्कर उगले, सुरेश सानप, अमोल कोकाटे, पंकज पेटारे, दत्ता गुंजाळ, गणेश सानप, रघुनाथ सानप, दता गुंजाळ, गणेश सानप उपस्थित होते.

Web Title: Debt-ridden farmers' sit-in agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.