शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा शॉक लागून तरुणाचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:33 IST

हरणबारी येथे मामाला शेतकामात मदत करताना लोखंडी नांगराच्या दांड्याचा ११ के. व्ही. विजेच्या तारांना स्पर्श होऊन दिनेश काळू चौरे (२२, रा. यशवंतनगर (धांद्री), ता. बागलाण) याचा जागीच मृत्यू झाला. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तरु णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

औंदाणे : हरणबारी येथे मामाला शेतकामात मदत करताना लोखंडी नांगराच्या दांड्याचा ११ के. व्ही. विजेच्या तारांना स्पर्श होऊन दिनेश काळू चौरे (२२, रा. यशवंतनगर (धांद्री), ता. बागलाण) याचा जागीच मृत्यू झाला. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तरु णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.दिनेश चौरे हा तरुण चार-पाच दिवसांपासून हरणबारी येथील मामा काळू चौधरी यांना भेटण्यासाठी आला होता. शेतात मामा बैलांच्या साह्याने काम करत असताना त्यांना कामात मदत म्हणून दिनेश शेतातून खांद्यावर लोखंडी नांगर आणत होता. या शेताच्या वरून ११ के.व्ही. वीजवाहिन्या गेल्या आहेत. या वाहिन्या पूर्ण लोबंकळत्या स्थितीत असून, जमिनीपासून अवघ्या १० फूट उंचीवर आहेत. या तारांचा अंदाज आला नसल्याने नांगराच्या दांड्याचा वीजवाहिन्यांना स्पर्श होऊन दिनेशला शॉक लागला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.  वेळोवेळी वीज कंपनीकडे तक्रार करूनही दुर्लक्षामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच वीज कर्मचारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :electricityवीजDeathमृत्यू