रशियात शिक्षण घेणाऱ्या वावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:38 AM2020-07-16T00:38:38+5:302020-07-16T00:39:11+5:30

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी गेल्या तीन वर्षांपासून रशियात वास्तव्य असणाºया तालुक्यातील वावी येथील २१ वर्षीय तरुणीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.१४) रात्री उशिरा घडली. या मृत्यूची बातमी बुधवारी कुटूंबियांना मिळाली. सेल्फी घेताना पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती कुटंबियांना समजली आहे.

Death of a Vavi student studying in Russia | रशियात शिक्षण घेणाऱ्या वावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

रशियात शिक्षण घेणाऱ्या वावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

Next
ठळक मुद्देसेल्फी बेतला जिवावर : कुटुंबीयावर शोककळा

सिन्नर : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी गेल्या तीन वर्षांपासून रशियात वास्तव्य असणाºया तालुक्यातील वावी येथील २१ वर्षीय तरुणीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.१४) रात्री उशिरा घडली. या मृत्यूची बातमी बुधवारी कुटूंबियांना मिळाली. सेल्फी घेताना पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती कुटंबियांना समजली आहे.
अश्विनी राजेंद्र गोराणे(२१) असे या तरुणीचे नाव असून तिचे कुटुंबीय वावी जवळच्या दुशिंगवाडी येथील रहिवासी आहेत. तिचे वडील वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लॅब टेक्निशियन या पदावर कार्यरत आहेत. नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर अश्विनीने २०१७ मध्ये रशियातील तंबोव स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी आॅफ रशियन फेडरेशन या विद्यापीठात एमबीबीएसच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. तेव्हापासून ती तेथेच वास्तव्य करत होती.
बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास संबंधित रशियन विद्यापीठाच्या मुंबई येथील मध्यास्थाने विद्यापीठाच्या कॅम्पस परिसरात मैत्रिणींसोबत फिरत असताना सेल्फी घेताना पाण्यात पडून अश्विनीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. कायदेशीर सोपस्कार झाल्यानंतर तिचा मृतदेह भारतात पाठवला जाईल.
मंगळवारी झाला संपर्क
मंगळवारी रात्री साडे आठ वाजेपर्यंत ती आपल्या कुटुंबीयांच्या संपर्कात होती. नेहमीप्रमाणे घरच्यांची फोनवर बोलणे झाल्यानंतर अभ्यासाला बसते असे सांगून अश्विनीने फोन बंद केल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले.


असे विद्यापीठाकडून कळवण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी रशियात गेलेल्या विद्यार्थीनीचा आकस्मिक मृत्यू झाल्याने वावी, दुशिंगपूर व परिसरात शोककळा पसरली आहे.

Web Title: Death of a Vavi student studying in Russia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.