बसच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 18:28 IST2019-01-20T18:28:39+5:302019-01-20T18:28:54+5:30
मायको सर्कल येथ्लृे खासगी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या अपघातात विठाबाई शांताराम ...

बसच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू
मायको सर्कल येथ्लृे खासगी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या अपघातात विठाबाई शांताराम ठाकरे (रा. त्रिमुर्ती चौक, सिडको) यांचा मृत्यू झाला. चेतन शांताराम ठाकरे (31) हे त्यांच्या आई विठाबाई यांच्यासह दुचाकीवरून (एम.एच.१५ जीपी ९१२६) मायको सर्कल परिसरातून जात होते. त्यावेळी
खासगी बसने (एम.एच १५ ईएफ ०३६०) चेतन यांच्या दुचाकीस धडक दिली. त्यात विठाबाई यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर अपघातानंतर बसचालक फरार झाला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.