पोहताना तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:29 IST2018-10-12T00:28:45+5:302018-10-12T00:29:10+5:30

पुणे महामार्गावरील शिंदे गावात असलेल्या गोडंबा नदीवरील बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या तुंगार गल्लीतील एका १८ वर्षीय तरु णाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

 Death of the swimmer | पोहताना तरुणाचा मृत्यू

पोहताना तरुणाचा मृत्यू

नाशिक : पुणे महामार्गावरील शिंदे गावात असलेल्या गोडंबा नदीवरील बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या तुंगार गल्लीतील एका १८ वर्षीय तरु णाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
अजिंक्य नंदू जाधव (१८) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. अजिंक्य जाधव हा बुधवारी (दि.१०) दुपारी ३.३० वाजता गोडंबा नदीवरील बंधाºयात पोहण्यासाठी गेला होता; मात्र तो घरी परतला नसल्याने कुटुंबीयांचा संशय बळावला. त्यानंतर त्याचा पाण्यात शोध घेण्यात आला अखेर सायंकाळच्या सुमारास अग्निशामक दलाच्या जवानांनी गावकºयांच्या मदतीने अजिंक्यचा मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढला.

Web Title:  Death of the swimmer