शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

'नेहरू पर्वतारोहण संस्थेचे' मानद संचालक हिमालयपुत्र संन्यासी स्वामी सुंदरानंद यांचे देहावसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 13:55 IST

उत्तर काशीतील प्रसिद्ध "नेहरू पर्वतारोहण संस्थेचे" ते अनेक वर्षे मानद संचालक होते. एव्हरेस्ट वीर तेनसिंग यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. एव्हरेस्ट कन्या बचिंद्री पाल, माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी पर्वतारोहणाचे आणि योगासनांचे धडे स्वामीजींकडून घेतले. त्यांचे वास्तव्य 1947 पासून गंगोत्रीतील तपोवन कुटीत होते. तेथेच "तपोवनम् हिरण्यगर्भ" नावाची पाच मजली आर्ट गॅलरी उभारण्यात आली आहे. याच ठिकाणी उद्या (दि.25 ) त्यांना भूसमाधी दिली जाईल, असे त्यांचे निकटवर्ती डॉ. अशोक लुथरा यांनी सांगितले.

ठळक मुद्देदेश विदेशात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहेत्तर वर्षात सुमारे दोन लाखांवर छायाचित्र टिपलीगंगोत्रीच्या वर असलेल्या एका ग्लेशियरला "सुंदर ग्लेशियर" वास्तव्य 1947 पासून गंगोत्रीतील तपोवन कुटीत होते

नाशिक हिमालयातील क्षेत्रात 'फोटोग्राफर बाबा' म्हणून ओळखले जाणारे संन्यासी स्वामी सुंदरानंद यांचे बुधवारी रात्री देहावसान झाले. ते 97 वर्षांचे होते. आपल्या कॅमेराने टिपलेल्या लक्षावधी छायाचित्रांच्या माध्यमातून सुमारे ७० वर्षातील हिमालयाच्या स्थित्यंतराचा आलेख जगभर पोहोचविणारे स्वामीजी हे "हिमालयाचा संदर्भ कोश" म्हणून ओळखले जात होते.मूळचे आंध्रप्रदेशातील अनंतपूर चे रहिवासी असलेले स्वामीजी वयाच्या 13 व्या वर्षी हिमालयात आले . त्यांनी वेदान्ताचे महान भाष्यकार स्वामी तपोवन महाराज यांचे शिष्यत्व स्वीकारले आणि आजीवन त्यांची सेवा केली. गुरुंच्याच प्रेरणेने गंगोत्रीत राहून 1947 पासून साधना, हिमालय भ्रमण आणि हिमालयाच्या पर्यावरण रक्षण अभियानाला प्रारंभ केला. गिर्यारोहणाचे अनेक विक्रम प्रस्थापित करीत असताना सत्तर वर्षात सुमारे दोन लाखांवर छायाचित्र टिपली. त्यावर आधारित "हिमालय : थ्रू द लेन्स ऑफ अ साधू" या ग्रंथाचे प्रकाशन दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांनी केले होते. देश विदेशात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.उत्तर काशीतील प्रसिद्ध "नेहरू पर्वतारोहण संस्थेचे" ते अनेक वर्षे मानद संचालक होते. एव्हरेस्ट वीर तेनसिंग यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. एव्हरेस्ट कन्या बचिंद्री पाल, माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी पर्वतारोहणाचे आणि योगासनांचे धडे स्वामीजींकडून घेतले. 1962 च्या भारत - चीन युध्दात त्यांनी लष्कराला हिमालयाल अज्ञात रस्ते दाखवून मार्गदर्शन केले होते. त्यांच्या या कार्याचा बहुमान म्हणून हिमालयातीय एका मार्गाला त्यांचे नाव देण्याला आले. शिवाय गंगोत्रीच्या वर असलेल्या एका ग्लेशियरला "सुंदर ग्लेशियर" आणि एका शिखराला "सुंदर शिखर" म्हणून ओळखले जाते. राष्ट्रपती भवन, संसद भवन, विविध विधान भवने यापासून देशातील प्रमुख शहरात त्यांनी स्लाईड शो चे शेकडो कार्यक्रम केले आणि जनसामान्यांना हिमालयाचा परिचय करून दिला. देशातील प्रमुख मासिकात आणि वर्तमानपत्रातून त्यांनी विपूल लेखन केले. डिस्कवरी चैनल, जपान ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनने त्यांच्यावर माहितीपट तयार केले आहेत़.त्यांचे वास्तव्य 1947 पासून गंगोत्रीतील तपोवन कुटीत होते. तेथेच "तपोवनम् हिरण्यगर्भ" नावाची पाच मजली आर्ट गॅलरी उभारण्यात आली आहे. याच ठिकाणी उद्या (दि.25 ) त्यांना भूसमाधी दिली जाईल, असे त्यांचे निकटवर्ती डॉ. अशोक लुथरा यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीTapovanतपोवनVK Singhव्ही के सिंगAndhra Pradeshआंध्र प्रदेश