शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नेत्याचा उष्माघाताने मृत्यू

By admin | Updated: April 1, 2017 15:57 IST

नाशिकमध्ये तालुका उपप्रमुखाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. निलेश गायकवाड असे त्यांचे नाव आहे.

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 1 - नाशिकमध्ये तालुका उपप्रमुखाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. निलेश गायकवाड असे त्यांचे नाव आहे. लासलगावाजवळील विंचूर येथील ही घटना आहे. उष्माघाताचा त्रास झाल्यानंतर त्यांना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झालं. 
 
गेल्या काही दिवसांपासून चैत्रातील उन्हाचे चटके जाणवू लागले असून, वातावरणातील उष्म्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे लोकांच्या जीव कासावीस होतोय. मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र व कोकण-गोव्याच्या काही भागांत तापमाननं कमालीचा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे लोकांना घराबाहेर पडणंही कठीण झालं आहे. त्यातच उष्माघातानं आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे.  
 
मध्य आणि उत्तर महाराष्ट्राला या उष्म्याचा जास्त फटका बसल्याची माहितीही भारतीय हवामान खात्यानं दिली आहे.  मालेगाव, सोलापूर, जळगाव येथे गेल्या काही दिवसांपासून तापमान 40 अंश सेल्सियसच्या वर जात होते. मंगळवारी नाशिक, सातारा ही तुलनेने थंड असलेल्या ठिकाणांवरही सर्वाधिक तापमान नोंदलं गेलं आहे. मात्र महाराष्ट्रात उष्णतेच्या लहरी नसल्याचं निर्वाळा देत हवेतील उष्णतेमुळे भीरामध्ये एवढं तापमान नोंदवण्यात आल्याची माहितीही भारतीय हवामान खात्याचे व्ही. के. राजीव यांनी दिली आहे.
 
तसेच येत्या काही दिवसांत तापमानात अशीच वाढ राहणार असल्याचंही भारतीय हवामान खात्यानं सांगितलं आहे. त्याप्रमाणेच राजस्थानातील बारमेरमध्ये 43.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. हरियाणात 42 अंश सेल्सियस, उत्तर प्रदेशमधल्या वाराणसी, अलाहाबाद, हामीरपूर आणि आग्रा येथेही तापमान 40 अंश सेल्सियसच्या वर गेलं होतं. त्यामुळे उष्णतेची लाट आणखी काही दिवस देशभरात जाणवणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्यानं दिलं आहे.⁠⁠⁠⁠