अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:26 IST2019-05-25T00:25:59+5:302019-05-25T00:26:54+5:30
राजीवनगर परिसरात रिक्षा व दुचाकी झालेल्या अपघातात रिक्षातून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असून, या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
इंदिरानगर : राजीवनगर परिसरात रिक्षा व दुचाकी झालेल्या अपघातात रिक्षातून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असून, या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या अपघातात मृत्ये झालेले अनंतराव कुलकर्णी यांचा मुलगा राजीवनगर येथील सागर अपार्टमेंटमधील प्रकाश कुलकर्णी (५३) यांनी याप्रकरणी फि र्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश कुलकर्णी यांचे वडील अनंतराव कुलकर्णी, आई व भाऊ व भावजई गुरुवारी (दि.२३) रिक्षाने सकाळी आठच्या सुमारास प्रकाश याच्या घरी येत होते. राजीवनगर येथील विठ्ठलमंदिर कॉर्नरला रिक्षा आली असता विठ्ठल मंदिराकडून दुचाकी क्रमांक एमएच १७ जे २४२ वरील चालकाने भरधाव वेगात येत अश्वमेध कॉलनीकडे जाताना रिक्षाच्या उजव्या बाजूने धडक दिली. त्यामुळे रिक्षातील प्रवासी आई, वडील व भाऊ भावजी रस्त्यावर पडले. या अपघातात अनंतराव कुलकर्णी (९४) यांना डोक्यास व छातीत दुखापत झाल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात औषध उपचारासाठी नेले. परंतु. डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या अपघाताविषयी प्रकाश कुलकर्णी यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात माहिती देत अपघातास कारणीभूत ठरलेल्या दुचाकीचालकावर विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.