नाशिकमधील कोरोनाबाधीतांचा मृत्यू दर देशातील सरासरी पेक्षा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 01:37 AM2020-09-25T01:37:27+5:302020-09-25T01:40:42+5:30

शहरात कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. लवकरच रूग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार करण्याच्या पध्दतीने नाशिक शहराचा मृत्यू दर पाच वरून १. ४६ इतका कमी झाला आहे. राज्याच्या आणि देशाच्या सरासरीच्या तुलनेत हा मृत्यू दर अत्यंत कमी आहे, अशी माहिती नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

The death rate of corona sufferers in Nashik is lower than the national average | नाशिकमधील कोरोनाबाधीतांचा मृत्यू दर देशातील सरासरी पेक्षा कमी

नाशिकमधील कोरोनाबाधीतांचा मृत्यू दर देशातील सरासरी पेक्षा कमी

Next
ठळक मुद्देआयुक्त कैलास जाधव : बरे होण्याचे प्रमाण अधिकमंजुर रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे प्रस्तावमास्क  न लावणा-यांवर कारवाई

नाशिक- शहरात कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी चाचण्या
वाढविण्यात आल्या आहेत. लवकरच रूग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार
करण्याच्या पध्दतीने नाशिक शहराचा मृत्यू दर पाच वरून १. ४६ इतका कमी
झाला आहे. राज्याच्या आणि देशाच्या सरासरीच्या तुलनेत हा मृत्यू दर
अत्यंत कमी आहे, अशी माहिती नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी
दिली. राज्यातील कोरोना बाधीतांचा मृत्यू दर २.७० तर देशाचा १.६० इतका
आहे, त्यापेक्षा नाशिकचा मृत्यू दर कमी आहे, असेही त्यांनी सांगितले.
शहरातील वाढत्या संसर्गाबाबत चिंतेचे वातावरण आहे. त्याबाबत त्यांच्याशी
साधलेला संवाद..

प्रश्न- शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे, त्यासंदर्भात काय सांगाल...
जाधव- शहरात कोरोना बाधीतांच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत.
कोरोनाबाधीत रूग्ण लवकर आढळल्यास त्याच्यावर लवकर उपचार सुरू होतात.
त्यामुळे त्याच्या पासून अन्य कोणाला संसर्ग होणार असेल तर तो रोखला
जातो. तसेच लवकर उपचारामुळे मृत्यू दर कमी होतो. आज नाशिक शहराचा मृत्यू
दर राज्याच्या आणि देशाच्या सरासरीपेक्षा कमी आहे. चाचण्यांचे
प्रमाणदेखील अशाच प्रकारे खूपच अधिक आहे. दहा लाख लोकसंख्येच्या तुलनेत
९२ हजार ७६९ इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबई पुण्याच्या तुलनेत
या चाचण्या खूप असल्या तरी ही शहरे अत्यंत मोठी आहेत. त्यामुळे
त्यांच्याशी थेट तुलना होत नसला तरी एकुणच चाचण्या वाढवणे ही खूपच
महत्वाची बाब आहे त्यामुळे मृत्यू दर कमी झाला आहे सर्वात महत्वाचे
म्हणजे बरे होणाºयांचे प्रमाण वाढले आहे. आठ दिवसांपूर्वी शहरात सहा हजार
अ‍ॅक्टीव रूग्ण होते आता ते ४३०० आहेत. यातूनच रूग्ण बरे होण्याचे प्रमाण
वाढल्याचे दिसते.

प्रश्न- कोरोना बाधीतांची संख्या वाढत असली तरी आता ती नियंत्रणात
आण्यासाठी काय उपाय आहेत?
जाधव-कोरोनाच्या चाचण्यांमुळे रूग्ण वाढीचा वेग जास्त दिसतो. विशेषत:
रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी राज्य आणि देशाच्या तुलनेत कमी आहे. हीच
काय ती त्रुटी आहे. महाराष्टÑात रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४४ दिवस
आहे. देशाचा कालावधी ४५ दिवस तर नाशिक शहराचा २६ दिवस इतका आहे. अर्थात,
संसर्ग कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने अनेक उपाययोजना केल्या जात
आहेत. नागरीकांनी आरोग्य नियमांचे पालन करावे यासाठी कारवाई वाढविण्यात
आली असून आता पोलीस आणि मनपाने संयुक्त कारवाई करावी असा प्रस्ताव आहे.
मास्क लावणे, सुरक्षीत अंतराचे पालन करणे आणि हॅँडसॅनिटायझरचा वापर इतके
नियम पाळले तरी रूग्ण संख्या कमी होईल.

प्रश्न- रूग्ण संख्या वाढत असताना वैद्यकिय उपचार सुविधा पुरेशा आहेत काय?
जाधव- महाापालिकेने रूग्णालये आणि अन्य सुविधा दिल्या आहेत. आॅक्सिजन
बेडसची संख्या वाढविली जात आहे. रूग्ण संख्या वाढली तर आॅक्सिजनची अडचण
भासू नये यासाठी नाशिकरोड येथील बिटको रूग्णालय तसेच डॉ. झाकीर हुसेन
रूग्णालय येथे आॅक्सिजनच्या टाक्या बसविण्यात येत आहेत. बिटको रूग्णालयात
टाकी बसविण्यासाठी फाऊंडेशनचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. झाकीर हुसेन
येथेही काम सुरू होत आहे. मुख्य प्रश्न मनुष्यबळाचा आहे. सध्या
तात्पुरत्या स्वरूपात कर्मचाºयांची भरती केली जात असली तरी किमान मंजुर
रिक्तपदे भरण्यासाठी मंजुरी मिळावी यासाठी राज्यशासनाला प्रस्ताव पाठविला
आहे. आकृतीबंधाच्या मंजुरीचे सोपस्कार नंतर केले तरी चालतील परंतु
वैद्यकिय विभागात स्थायी पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे .
* मुलाखत संजय पाठक

Web Title: The death rate of corona sufferers in Nashik is lower than the national average

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.