विहीरीत पडून विवाहीतेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 18:31 IST2021-07-31T18:31:18+5:302021-07-31T18:31:24+5:30
चांदवड : तालुक्यातील मंगरुळ येथे विवाहीता विहीरीत पडल्याने तीचा मृत्यु झाला.

विहीरीत पडून विवाहीतेचा मृत्यू
चांदवड : तालुक्यातील मंगरुळ येथे विवाहीता विहीरीत पडल्याने तीचा मृत्यु झाला.
अश्विनी मच्छिंद्र थोरात (२१) (राहणार करंजगाव पांढरी ता. दिंडोरी) ही विवाहिता बाळू निरभवणे यांच्या घराजवळील विहिरीत शनिवारी (दि.३१) दुपारी साडेचारच्या सुमारास विहीरीत पडली. तिला गावातील तरुण गणेश खैरनार यांनी वर काढले, त्यानंतर तिला चांदवड उपजिल्हा रुग्णालयात नेले असता तेथील डॉ. श्रीमती वाघमारे यांनी मृत घोषित केले. उत्तर तपासणी करुन तीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
घटनास्थळी चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, उपनिरीक्षक विशाल सनस, पोलीस हवालदार बापू चव्हाण, योगेश हेमाडे, देशमुख, महिला कर्मचारी कविता साळवे आदिंनी पंचनामा केला. याप्रकरणी चांदवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.