रेल्वेतून पडून विवाहितेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:56 IST2019-06-19T01:55:08+5:302019-06-19T01:56:26+5:30

औरंगाबाद रोडवरील आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओढा येथे भरधाव रेल्वेतून पडून २२ वर्षीय विवाहिता ठार झाल्याची घटना घडली.

Death of a married widow by a train | रेल्वेतून पडून विवाहितेचा मृत्यू

रेल्वेतून पडून विवाहितेचा मृत्यू

नाशिक : औरंगाबाद रोडवरील आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओढा येथे भरधाव रेल्वेतून पडून २२ वर्षीय विवाहिता ठार झाल्याची घटना घडली.
दिशा नितीन ठाकरे (२२, रा. वडाळागाव, गणेशनगर) असे मयत महिलेचे नाव असून, ओढ्याजवळील रेल्वे लाईनवरून ट्रेन भरधाव वेगात जात असताना दिशा ठाकरे खाली पडल्या. या घटनेत त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर मार लागल्याने उपचारासाठी दीर सचिन ठाकरे व वडील संजय सोनवणे यांनी बिटको रुग्णालयात दाखल केले असता डॉ. गरुड यांनी तपासून मृत घोषित केले. अधिक तपास पोहवा लोहकरे करीत आहेत.

Web Title: Death of a married widow by a train