मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या पित्याचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 01:08 IST2018-12-16T01:07:48+5:302018-12-16T01:08:03+5:30

मुलाच्या शाळेचे वाहन न आल्याने त्यास भोसला मिलिटरी शाळेत सोडविण्यासाठी दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाचा दुचाकीला धक्का लागून झालेल्या अपघातात पित्याचा मृत्यू, तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि़१५) सकाळच्या सुमारास महात्मानगरच्या जुना आयडिया आॅफिससमोर घडली़

Death in a father-father accident near school | मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या पित्याचा अपघातात मृत्यू

मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या पित्याचा अपघातात मृत्यू

ठळक मुद्देमहात्मानगरातील घटना : दुचाकीचा लागला कट; मुलगा गंभीर

नाशिक : मुलाच्या शाळेचे वाहन न आल्याने त्यास भोसला मिलिटरी शाळेत सोडविण्यासाठी दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाचा दुचाकीला धक्का लागून झालेल्या अपघातात पित्याचा मृत्यू, तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि़१५) सकाळच्या सुमारास महात्मानगरच्या जुना आयडिया आॅफिससमोर घडली़ नितीन शिवाजी शिंदे (३८, रा. घर नंबर ५२, गीतामाई सोसायटी, जाधव संकुल, कामटवाडा, नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी पित्याचे नाव आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेतून सावरत शिंदे कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत मयत नितीन शिंदे यांचे नेत्रदान करून आदर्श ठेवला आहे़
गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामटवाड्यातील जाधव संकुल परिसरातील रहिवासी नितीन शिंदे यांचा आठ वर्षीय मुलगा प्रसन्न हा भोसला मिलिटरी स्कूलमध्ये आहे़

Web Title: Death in a father-father accident near school