कौटुंबिक वादातून पेटविलेल्या चिमुकलीचा मृत्यू : पत्नी गंभीर

By Admin | Updated: February 10, 2015 01:17 IST2015-02-10T01:16:51+5:302015-02-10T01:17:35+5:30

कौटुंबिक वादातून पेटविलेल्या चिमुकलीचा मृत्यू :

Death of a family stranger, wife serious | कौटुंबिक वादातून पेटविलेल्या चिमुकलीचा मृत्यू : पत्नी गंभीर

कौटुंबिक वादातून पेटविलेल्या चिमुकलीचा मृत्यू : पत्नी गंभीर

  नाशिक : कौटुंबिक वादानंतर संतप्त झालेल्या पतीने आपल्या पत्नीसह आठ महिन्यांच्या चिमुकलीवर पेट्रोल टाकून पेटविल्याची घटना रविवारी सायंकाळी ओझर येथे घडली होती़ या घटनेत भाजलेल्या आठ महिन्यांच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, पत्नीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे़ दरम्यान, यातील संशयित सागर पवार विरोधात ओझर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ओझर येथील नागेश्वर चौकात राहणारे सागर पवार व दीपाली पवार या दोघांमध्ये कौटुंबिक वाद होते़ त्यामुळे दीपालीने न्यायालयात खावटीसाठी दावादेखील केला होता़ या कारणावरून रविवारी (दि़ ८) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास संशयित सागर व त्याची पत्नी दीपाली यांच्यामध्ये वाद झाला़ यामध्ये संतापलेल्या सागरने दीपाली व तिच्या मांडीवर असलेल्या आठ महिन्यांची मुलगी आरोही या दोघींच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले़ यामध्ये आरोही ८० टक्के, तर दीपाली ४४ टक्के भाजल्याने या दोघींनाही परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले़ मात्र आरोहीचा उपचारदरम्यान मृत्यू झाला़ या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात संशयित सागर पवार विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Death of a family stranger, wife serious