अपघातात आठ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 22:53 IST2019-05-12T22:52:58+5:302019-05-12T22:53:21+5:30
सिन्नर : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे बायपासजवळ शनिवारी सकाळी झालेल्या अपघातात आठ महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

अपघातात आठ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू
सिन्नर : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे बायपासजवळ शनिवारी सकाळी झालेल्या अपघातात आठ महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
ईश्वरी तुषार देशमुख (८ महिने) रा. कासारवाडी, ता. सिन्नर असे मृत बालिकेचे नाव आहे. याबाबत सचिन देशमुख यांच्या फिर्यादीवरून कारचालक सुनील शांताराम मेमाणे रा. चिखली, ता. संगमनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार दिलेल्या माहितीनुसार नांदूरशिंगोटे बायपासजवळ शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातात आठ महिन्यांच्या ईश्वरीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ईश्वरीच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार पी. के. अढांगळे हे पुढील तपास करीत आहे. कासारवाडी येथील गुलाब देशमुख हे सून व नातवंडासह दुचाकीने (क्र. एमएच १५ एफजी ९६७७) नांदूरशिंगोटेकडून सिन्नरकडे जात असताना संगमनेर बाजूने पाठीमागून वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओने (क्र. एमएच १५ बीएन २४१३) जोरधार धडक दिली. दुचाकीला धडक बसल्याने ईश्वरीची आई व भाऊ रस्त्यावर पडल्याने जखमी झाले.