निवृत्तिनाथ पालखी मिरवणुकीत भाविकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 01:05 IST2018-08-19T01:04:55+5:302018-08-19T01:05:08+5:30

पंढरपूर येथून परतलेल्या संत निवृत्तिनाथ पालखी मिरवणुकीत नाचत असलेल्या मुंबईतील वृद्ध भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़ १८) ्नरोजी घडली़

Death of the devotee in Nivittnath Pakhi procession | निवृत्तिनाथ पालखी मिरवणुकीत भाविकाचा मृत्यू

निवृत्तिनाथ पालखी मिरवणुकीत भाविकाचा मृत्यू

नाशिक : पंढरपूर येथून परतलेल्या संत निवृत्तिनाथ पालखी मिरवणुकीत नाचत असलेल्या मुंबईतील वृद्ध भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़ १८) ्नरोजी घडली़ किरण व्यंकटेश कुलकर्णी (रा. बोरीवली) असे त्याचे नाव आहे. त्यांंचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा अंदाज वैद्यकीय सूत्रांनी वर्तविला आहे़ आषाढीनंतर संत निवृत्तिनाथ पालखी परतते़ पालखीचे शनिवारी आगमन झाल्यानंतर मिरवणूक काढण्यात आली़ त्यात किरण कुलकर्णी हे आले होते़ कुलकर्णी मिरवणुकीत नाचत असताना त्यांच्या छातीत दुखू लागल्याने नातेवाइकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले़

Web Title: Death of the devotee in Nivittnath Pakhi procession