बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 17:48 IST2018-12-01T17:48:20+5:302018-12-01T17:48:37+5:30

वेळुंजे(त्र्यं) : त्र्यंबकेश्वर ते तोरंगणला निघालेल्या एसटी बसने (एम.एच. ०७ सी ७३०४) शुक्रवारी (दि.३०) दुपारी ३ वाजता तोरंगण (त्र्यं) बसने अंबई जवळ मोटारसायकलवरून चाललेल्या सोमनाथ अमृता भुतांबरे युवकाला सामोरा-समोर येऊन जोरात धडक दिल्याने तो मृत्यु पावला.

The death of the bus in the bus crash | बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

ठळक मुद्देसहाय्यक पोलिस उपनिरीक्षक खैरे अधिक तपास करत आहे.

वेळुंजे(त्र्यं) : त्र्यंबकेश्वर ते तोरंगणला निघालेल्या एसटी बसने (एम.एच. ०७ सी ७३०४) शुक्रवारी (दि.३०) दुपारी ३ वाजता तोरंगण (त्र्यं) बसने अंबई जवळ मोटारसायकलवरून चाललेल्या सोमनाथ  भुतांबरे युवकाला सामोरा-समोर येऊन जोरात धडक दिल्याने तो मृत्यु पावला.
 त्याला त्र्यंबकेश्वर मधील उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केले. परंतु गंभीर मार लागलेला असल्याने त्याला उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.  तिथे त्याच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी (दि.१) सकाळी ६ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सोमनाथ अमृता भुतांबरे (२२) असे मृत्यू पावलेल्या तरु णाचे नाव आहे. त्याच्या कुटुंबात पत्नी, एक वर्षाचा मुलगा, आई, वडील असा परिवार आहेत. अपघातानंतर बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांचा मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक खैरे अधिक तपास करत आहे.

 

Web Title: The death of the bus in the bus crash

टॅग्स :Accidentअपघात