शिव कॉलनीत मृत लांडोर आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 01:21 IST2020-09-28T23:22:20+5:302020-09-29T01:21:55+5:30
इंदिरानगर : वडाळा पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या शिव कॉलनीत मृत्य अवस्थेत लांडोर सापडल्याने तातडीने वनविभागास कळविण्यात आले.

शिव कॉलनीत मृत लांडोर आढळला
इंदिरानगर : वडाळा पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या शिव कॉलनीत मृत्य अवस्थेत लांडोर सापडल्याने तातडीने वनविभागास कळविण्यात आले.
दोन दिवसापूर्वीच इंदिरानगर येथील आदर्श कॉलनीत राष्ट्रीय पक्षी मोराचे परिसरातील नागरिकांना दर्शन घडविले होते त्यावेळी नागरिकांनी बघ्यांची गर्दी केली होती. ही घटना ताजी असतानाच सोमवार (दि२८) रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास लष्कर कंपाऊंड जवळ असलेल्या शिव कॉलनीत मृत अवस्थेत लांडोर आढळून आला तातडीने परिसरातील नागरिकांनी प्रभागाचे नगरसेवक अँड शाम बडोदे यांना कळविले त्यांनी घटनास्थळी जाऊन वनविभागास त्याची खबर दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन मृत्यू झालेल्या लांडग्याला ताब्यात घेतले असून पोस्टमार्टम केल्यावर मृत्यूचे कारण समजणार असल्याचे सांगितले
गेल्या काही दिवसापासून शिव कॉलनी व पांडव नगरी हा भाग लष्कराच्या कंपाऊंड जवळ असल्याकारणाने त्या ठिकाणी जंगलातील मोर व लांडोर परिसरात अधूनमधून येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. मोकाट कुत्रे त्यांच्यावर हल्ला करत असल्याने त्यातून ही घटना घडल्याची शक्यता नाकारता येत नाही.