सटाणा -डांगसौदाणे जवळ आढळला एक बेवारस मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 18:13 IST2019-12-01T18:12:25+5:302019-12-01T18:13:27+5:30

डांगसौंदाणे : येथील सटाणा-डांगसौंदाणे रस्त्यावरील इस्सार पेट्रोलपंपाजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये बेवारस स्थितीत एका इसमाचा बेवारस मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

A dead body was found near Satana-Dangsoudane | सटाणा -डांगसौदाणे जवळ आढळला एक बेवारस मृतदेह

सटाणा -डांगसौदाणे जवळ आढळला एक बेवारस मृतदेह

ठळक मुद्देपोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.

डांगसौंदाणे : येथील सटाणा-डांगसौंदाणे रस्त्यावरील इस्सार पेट्रोलपंपाजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये बेवारस स्थितीत एका इसमाचा बेवारस मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सटाणा पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी की, सटाणा डांगसौंदाणे रोडवरील कैलास बोरसे यांच्या मालकीचा इसार पेट्रोल पंपाजवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अनोळखी पुरु ष जातीचा मृतदेह असल्याची खबर सटाणा पोलिस स्टेशनला कैलास बोरसे यांनी दिल्यानंतर पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील यांचेसह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.
सदरील घटनेचा पंचनामा करत मृतदेह डांगसौंदाने ग्रामीण रु ग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आला. मयताच्या अंगात सफेद चौकटी शर्ट व राखाडी कलरची पॅन्ट असून, मृताची ओळख पटविण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मदत करण्याकामी पोलिसांमार्फत आवाहन करण्यात आले आहे.
पुढील तपास पोलिस हवालदार प्रकाश जाधव, जयसिंग सोळंके व पोलिस शिपाई राहुल शिरसाठ हे करित आहेत.

Web Title: A dead body was found near Satana-Dangsoudane