आदिवासी अधिकार दिनानिमित्त जिल्ह्यातील अडीच हजार आदिवासी बांधव रांचीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 07:00 PM2018-09-16T19:00:21+5:302018-09-16T19:03:41+5:30

सुरगाणा : आदिवासी अधिकार दिनानिमित्त झारखंडमधील रांची येथे झालेल्या मेळाव्यास संपुर्ण भारतातील ५० हजार आदिवासी उपस्थित होते. नाशिकमधून आमदार नरहरी झिरवाळ यांच्यासह सुमारे अडीच हजार आदिवासी प्रतिनिधी सहभागी झाले होते. हरमू मैदान रस्त्यावरु न आदिवासी नृत्य, गाणी, कलापथकांनी सांस्कृतिक पोशाखात कलासंस्कृतीचे सादरीकरण केले.

 On the day of tribal rights, two and a half thousand tribal brothers in the district, Ranchi | आदिवासी अधिकार दिनानिमित्त जिल्ह्यातील अडीच हजार आदिवासी बांधव रांचीत

आदिवासी अधिकार दिनानिमित्त जिल्ह्यातील अडीच हजार आदिवासी बांधव रांचीत

Next
ठळक मुद्देमराठी भाषेतील घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

सुरगाणा : आदिवासी अधिकार दिनानिमित्त झारखंडमधील रांची येथे झालेल्या मेळाव्यास संपुर्ण भारतातील ५० हजार आदिवासी उपस्थित होते. नाशिकमधून आमदार नरहरी झिरवाळ यांच्यासह सुमारे अडीच हजार आदिवासी प्रतिनिधी सहभागी झाले होते.
हरमू मैदान रस्त्यावरु न आदिवासी नृत्य, गाणी, कलापथकांनी सांस्कृतिक पोशाखात कलासंस्कृतीचे सादरीकरण केले. यावेळी संविधान बचाव, देश बचाव, एक तिर एक कमान, सारे आदिवासी एक समान, जल जंगल जमीन हमारा है, हमें चाहिए आजादी, मनु वादसे, भष्टाचार से, आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. रांची शहरात गुरूवारी झालेल्या या मेळाव्यात अनुसुचित क्षेत्रात ५ वी आणि ६ वी अनुसुची लागू करणे, आदिवासी संस्कृतीवर विविध धर्माचे धार्मिक आक्र मण रोखणे, युनोने दिलेले मुलभूत अधिकारात ४६ कलमी घोषणा पत्रातील अधिकार लागू करणे, देशातील आदिवासींवर होणारे अन्याय अत्याचार व शोषणाविरूद्ध आंदोलन उभे करणे, शिक्षण आरोग्य कुपोषण अ‍ॅट्रोसिटी कायदा आरक्षण, वन अधिकार कायद्यावर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले.
या कार्यक्र मासाठी, महाराष्टÑ, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, आसाम, ओरिसा, राज्यस्थान, दादरा नगर हवेली, प. बंगाल, दिल्ली, उत्तरांचल, तेलंगणा या १३ राज्यांसह नेपाळ येथील ५० हजार आदिवासी बांधव उपस्थित होते. रांचीतील या मेळाव्यात आदिवासी एकता परिषदेचे महासचिव अशोक चौधरी, गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री अमरसिंग चौधरी, पोरलाल खरते, अशोक बागुल, प्रभु टोकीया, माजी सनदी अधिकारी टी. के. बागुल, प्रभाकर पवार, यशवंत पवार, राम चौरे, सी. एल. पवार, किसन ठाकरे, जयवंत गारे, बी. बी. बहिरम, के. के.गांगुर्डे, डॉ. जगदीश चौरे, चिंतामण गायकवाड, एन.एस. चौधरी, रतन चौधरी, पांडुरंग पवार, देविदास देशमुख, श्रीकांत पवार, विनायक भोये, हरिराम गावित, तुकाराम भोये, हिरामण चौधरी, लक्ष्मण भोये, नामदेव जोपळे, तुकाराम जाधव, राजू चौधरी, चंदर चौधरी, यांच्यासह नाशिक जिल्ह्यÞातील पेठ, सुरगाणा, कळवण सुमारे अडीच हजार आदिवासी प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी प्रत्येक राज्यातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. या रॅलीचे प्रतिनिधीत्व सुरगाणा तालुक्यातील आदिवासी शिक्षक संघटनेने केले.
यावेळी बिरसा मुंडा यांच्या स्मारकास उपस्थितांनी भेट दिली.
 

Web Title:  On the day of tribal rights, two and a half thousand tribal brothers in the district, Ranchi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक